शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

आंबोली-दोडामार्गच्या जंगलात दुर्मीळ ‘माकडा’चा वावर, स्थानिक निसर्गप्रेमींना दिसले ‘लाजवंती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 06:10 IST

Amboli-Dodamarg : ‘लाजवंती’ निशाचर असून, तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ही म्हटले जाते.

-  संदीप आडनाईक

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली-दोडामार्गच्या जंगलात स्थानिक निसर्गप्रेमींना दुर्मीळ ‘लाजवंती’ म्हणजेच ‘स्लेंडर लोरीस’ या माकड कुळातील प्राण्याचे दर्शन शनिवारी घडले. आंबोली आणि दोडामार्ग या संवर्धन राखीव वनक्षेत्रात हा प्राणी आढळला आहे. मात्र, या दुर्मीळ प्राण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मधील त्याचे नेमके स्थान गुप्त ठेवण्यात आले आहे.‘लाजवंती’ निशाचर असून, तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ही म्हटले जाते. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. लाजवंतीचा आकार ४० सेंटिमीटर असून, त्याचे वजन १८० ग्रॅम असते.‘लाजवंती’ या माकड कुळातील दुर्मीळ प्राण्याचे वास्तव्य भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांमध्ये आढळते. पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये ‘लाजवंती’चे वास्तव्य असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही केवळ तिलारी आणि परिसरातच हा प्राणी आढळतो.

राखीव वनक्षेत्रात आढळलेगेल्याच महिन्यात राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीने सरकारने नव्यानेच घोषित केलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग’ संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये या दुर्मीळ प्राण्याचे दर्शन स्थानिक निसर्गप्रेमी संजय सावंत, तुषार देसाई, अमित सुतार आणि संजय नाटेकर यांना झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन