शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याची भिंत चौथ्यांदा कोसळली

By admin | Updated: February 9, 2015 00:39 IST

आणखी ७० फूट लांब तटबंदीला धोका रंकाळाप्रेमींतून संतापाची लाट अस्मितेला भगदाड : प्रशासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आक र्षण असलेल्या रंकाळा तलावाचे दुर्दैव काही संपेना. गेल्या वर्षभरात तीनवेळा रंकाळ्याची संरक्षक भिंत कोसळली. या पडलेल्या भगदाडाच्या कामाचा पत्ता नाही, तोपर्यंत रविवारी पहाटे पुन्हा एकदा भिंतीचा मोठ्या भागाने जलसमाधी घेतली. महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत असल्याचा तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.वर्षभरात तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असतानाच रविवारी पहाटे तटबंदीचा आणखी एक भाग चौथ्यांदा कोसळला. यापूर्वी पडलेल्या भगदाडाच्या खालील भाग पाण्यात कोसळला होता. संरक्षक भिंतीसह ३० ते ३५ फुटांचा मोठा भाग पुन्हा पाण्यात कोसळला. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच काही ठोस उपाययोजना राबविल्या नाहीत, तर मात्र रंकाळा उद्यानाकडील साधारण सत्तर ते ऐंशी फुटांपर्यंतची तटबंदी पुन्हा पाण्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शालिनी पॅलेस ते नवनाथ मंदिर या परिसरातील तटबंदीच्या मजबुतीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. अद्याप मजबुतीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरूच झालेले नाही. आता तर रंकाळ्याची संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. शालिनी पॅलेस उद्यानातील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचलेला आहे वरील बाजूने तटबंदी वेडीवाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. रंकाळ्याकडे दररोज पर्यटक मोठ्या संख्येने उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक पायी चालत फिरतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे दिवसा पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)