शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून रंकाळा परिसर चकचकीत

By admin | Updated: October 16, 2015 23:24 IST

शिवाजी विद्यापीठाची मोहीम : कुलगुरू, पोलीस अधीक्षकांसह सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे श्रमदान; दहा टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) सुमारे सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून शुक्रवारी रंकाळा तलाव परिसर स्वच्छ केला. ‘स्वच्छ भारत - स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या मोहिमेत इराणी खणीसह मोहिते खण, रंकाळा पदपथ, पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान, तसेच रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, काचेच्या बाटल्या, काटेरी झुडपे असा दहा टन कचरा जमा झाला. ही मोहीम अडीच तासांहून अधिक वेळ राबविण्यात आली.मोहिमेसाठी सकाळी साडेआठ वाजता इराणी खण येथे विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी पोहोचले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते. पूर्वनियोजनानुसार मोहिमेला सुरुवात झाली. यात खुरपे, खराटा, फावडे, आदी साहित्य घेऊन सर्वजण श्रमदान करीत होते. कचरा उचलणे, खराटा मारणे अशी कामे डॉ. शिंदे, डॉ. शर्मा हे करीत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. त्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. खणीतून प्लास्टिक पिशव्या, कचरा, विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व मुखवट्यांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. खणीच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा गोळा केला. शिवाय अनावश्यक काटेरी झुडपे साफ केली. मोहिमेअंतर्गत सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे २५ सफाई कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पालिकेतर्फे दोन डंपर, एक जेसीबी, पाण्याचा टँकर, दोन धूर फवारणी यंत्रे, पाच कीटकनाशक फवारणी यंत्रे, आदी सामग्री उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता. यातील अनेकांनी स्वच्छतेसाठी हातात घेतलेला झाडू, बुट्टी, खुरपे, आदी कामे करीत असतानाच मोबाईलवरून ‘सेल्फी’ टिपला. (प्रतिनिधी)ंमोहिमेत यांनी घेतला सहभागस्वच्छता मोहिमेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’ संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, वासंती रासम, भगवान माने, अमोल मिणचेकर, प्राचार्य एस. एस. गवळी, एच. एस. वनमोरे यांच्यासह शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, केएमसी, गोखले कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील शिक्षक, कर्मचारी व ‘एनएसएस’चे विद्यार्थी सहभागी झाले होते. भविष्यात रंकाळ्याचे चिरतारुण्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून यापुढे देखील या ठिकाणी स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले मन तसेच पाणी कधीही गढूळ होऊ देता कामा नये. या गोष्टी जितक्या स्वच्छ व पारदर्शक ठेवाल, तितके आपले जीवन उत्तम व निरोगी पद्धतीने व्यतीत होईल.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आवाहनानुसार ८ मे रोजी विद्यापीठाने स्वच्छता मोहीम सुरू आहे. गणेश विसर्जनानंतर इराणी खण परिसरातील स्वच्छता करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी मोहीम घेतली.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ