शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची येत्या शुक्रवारपासून रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम सविस्तर जाणून घ्या

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 3, 2023 19:11 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४८ ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवारी (दि.६) नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यादिवसापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईल.दुसरीकडे आता गावागावातील राजकारणाला वेग येणार असून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. निवडणुक आयोगाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व ३०८० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींची सार्वतत्रिक, समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने आरक्षण निश्चित करुन दिलेल्या ४ अशा ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तसेच जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमधील ६६ सदस्य व ६ सरपंच अशा ७२ पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे.  लोकसभा, विधानसभेइतकीच ग्रामपंचायत पातळीवरील निवडणूक ईर्ष्येची असते. मतदारसंघ लहान आणि लागून असतात. त्यात भाऊबंदकी, नात्यागोत्यातील पै पाहुणे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असल्याने ईर्ष्या मोठ्या प्रमाणात असते. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे अधिक वर्चस्व असते. पॅनेलद्वारे निवडणूक लढवली जाते. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी टोकाचे प्रयत्न केले जातात. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी  आता कार्यक्रम जाहीर झाल्याने गावागावातील वातावरण आणि राजकारण तापणार आहे.  निवडणूक कार्यक्रम असा 

  • नोटीस प्रसिद्धी : ६ ऑक्टोबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : १६ ते २० ऑक्टोबर 
  • छाननी : २३ ऑक्टोबर
  • माघार, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप : २५ ऑक्टाेबर
  • मतदान : ५ नोव्हेंबर
  • मतमोजणी : ६ नोव्हेंबर 
  • अधिसुचना प्रसिद्धी : ९ नोव्हेंबर
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक