शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’-यूपीएससी’मध्ये धवल यश : शिंगणापूर, चंदगडसह विजापुरातही आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:19 IST

‘कोल्हापूर : जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत किरण चव्हाण याने ७७९व्या रँकने धवल यश मिळवत लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’ प्रज्वलित केला आह.

‘कोल्हापूर : जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत किरण चव्हाण याने ७७९व्या रँकने धवल यश मिळवत लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’ प्रज्वलित केला आह.विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील देवहिप्परगी या दुष्काळी परिसरातील चव्हाण कुटुंब २५ वर्षांपूर्वी पोटासाठी कोल्हापुरात आले. वर्षानुवर्षे प्रशस्त रस्त्याची कामे करणारे लमाणी समाजातील हे कुटुंब शिंगणापूरला स्थायिक झाले. तिथेच किरणचं पहिली ते सहावी शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी बहीण कमल आणि भावोजी रवी राठोड यांनी त्याला आपल्याकडे कोकणात पणदूर येथे नेले. दहावीपर्यंत किरणचे शिक्षण कुडाळच्या शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. तोपर्यंत किरणचा मोठा भाऊ शिवराज हा चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथे रस्त्याची कामे घेत तेथेच स्थायिक झाला. त्याने किरणला आपल्याकडे बोलावून घेतले आणि चंदगडच्या न. भु. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथून किरण बारावी शास्त्र परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे त्याने आॅल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१५ साली मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.सकारात्मक दृष्टिकोनातून यश : अजय कुंभारकोल्हापूर : आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोनामुळेच मी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया ‘यूपीएससी’त यशस्वी झालेल्या किसरूळ (ता. पन्हाळा) येथील अजय गणपती कुंभार यांनी व्यक्त केली.अजय कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाटपन्हाळा येथे, तर माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात झाले, तर वालचंद महाविद्यालयातून मॅकेनिकलमधून पदवी घेतली. यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे २०१५ पासून ‘यूपीएससी’ची तयारी केली. दररोज आठ ते दहा तास अभ्यासाचे नियोजन केले होते.वडील गणपती, आई शोभा या प्राथमिक शिक्षक आहेत. भाऊ अक्षय हा ‘केआयटी’ महाविद्यालयात शिकत आहे.