शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांची परंपरागत पद्धतीने रमजान ईद; देशाची एकात्मता, सुख, शांती अबाधित राहावी यासाठी केली प्रार्थना

By संदीप आडनाईक | Updated: April 22, 2023 19:01 IST

मुस्लीम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर रमजान ईदची नमाज पठण

कोल्हापूर : मुस्लीम बांधवांचा रमजान ईद (ईद-उल-फित्र) शनिवारी मोठ्या उत्साहात सर्वधर्मीयांनी मिळून साजरा केला. प्रतिवर्षीप्रमाणे परंपरागत पद्धतीने मुस्लीम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली. नमाज पठणदरम्यान सर्वांनी मिळून कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता आणि सुख, शांती अबाधित राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना इतर सर्वच समाजांतील लोकांनी शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरात हिंदू-मुस्लीम भाई-भाई ही भावना कायमच कृतीतून जोपासली जाते, त्याचेच प्रत्यंतर शनिवारीही पुन्हा आले. ईद हा सण मुस्लीम बांधवांचा असला तरी मित्र परिवारांना शिरखुर्म्याचे वाटप झाले. अक्षय तृतीयाचे गोडधोड घरी खाऊन सायंकाळी अनेकांनी मुस्लीम मित्रांच्या घरी जाऊन बिर्याणीचा आस्वाद घेतला.पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशात कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि नमाज पठण केले. दुसऱ्या जमातच्या नमाजकरिता हाफीज अकिब म्हालदार आणि तिसऱ्या जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले.यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती, मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटक धाेंड, रणजित पोवार, बापू मुल्ला उपस्थित होते. स्वागत संस्थेचे प्रशासक कादर मलबारी यांनी केले. चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले.

शिरखुर्म्याचे वाटपयाप्रसंगी मुस्लीम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारुख पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम