शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूरच्या राख्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:39 IST

सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या राख्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवतीलबाळासाहेब कडोलकर स्वामी विवेकानंद ट्रस्टतर्फे सैनिकांना राख्या प्रदान

कोल्हापूर : देशासाठी अहोरात्र सजग असलेल्या तमाम सैनिकांचा आत्मविश्वास वाढविण्याची ताकद कोल्हापुरातून पाठविल्या जात असलेल्या तमाम भगिनींच्या राख्यांमध्ये आहे. त्यामुळेच सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले.येथील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कारगील युद्धापासुन एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम यंदा प्रतीकात्मक स्वरुपात पार पडला.जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातील युवती, बचतगटांच्या महिला या उपक्रमात सहभागी होत असून मुल्य शिक्षणाचा भाग म्हणून गोवा राज्यासह विविध जिल्ह्यात यांचे अनुकरण होत असल्याचे प्रारंभी सचिव राजेंद्र मकोटे यांनी सांगितले.

या सैनिकासाठी राखी उपक्रमांर्तगत जमा होणा-या लाखो राख्या प्रतिवर्षी थेट सीमेवर पाठवल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूपामध्ये घेतलेला हा कार्यक्रम आगामी आगामी काळात व्यापकपणे करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी सांगितले.

जिल्हा माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर एम.एन.पाटील सांगवडेकर म्हणाले, हा उपक्रम आजी माजी सैनिकांसाठी लाख मोलाचा आहे. उपजिल्हा सैनिक अधिकारी चंद्रशेखर पागे, डाँ.सायली कचरे, श्रेयस भगवान यांनी ही मनोगते व्यक्त केली.

यावेळी रोटरी स्मार्टसिटीवतीने विवेकानंद ट्रस्टला मानसिंग पानसकर , शामराव घोरपडे , सुरेश सुतार , सुरेश खांडेकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.सुनीता मेंगाणे, आनिता काळे, यशश्री घाटगे, सुलोचना नारवेकर, आदिती - ,रेवती घाटगे यांनी राख्या बांधल्या. आभार कमलाकर किलकिले यांनी मानले. यावेळी सदस्य मालोजी केरकर , प्रशांत बरगे , सुखदेव गिरी, महेश कामत , रविराज कांबळे यांच्यासह आदर्श प्रशाला, चाटे स्कूल , कन्या विद्यालय कळंबा येथील शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनkolhapurकोल्हापूर