शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetty: राजू शेट्टींची पदयात्रा आज नृसिंहवाडीत येणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त, रेस्क्यू फोर्सला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 09:05 IST

पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत.

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा पूरग्रस्तांना न्याय द्या या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून काढलेली पदयात्रा आज नृसिंहवाडीत पोहचणार आहे. नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार अशी घोषणा केल्यामुळे प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. दि. 1 सप्टेंबर पासून प्रयाग चिखली येथे या पंचगंगा नदीच्या परिक्रमा पदयात्रेची सुरूवात केली असून 4 दिवसात ९० किमीचे अंतर कापून अब्दुललाट येथे काल रात्री उशीरा ही पदयात्रा पोहचली आहे. 

पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत. आज दुपारी 3 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन होणार आहे. 

पूरग्रस्तांच्या मागण्या-१) २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकर्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा.२) पूरग्रस्तांचे मागणीप्रमाणे सोयीचे पुनवर्सन करा.३) कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा.४) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची   सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.५) २००५ ते २०२१ पर्यंत ४ मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठचे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी. ६) महापुरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहीरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडकळून पडल्या आहेत. यंत्रमागधारकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना सरकारने तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी. 

७) महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे. त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी