शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीप्रदर्शनाने राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल : बैलगाडीतून रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:07 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देशक्तीप्रदर्शनाने राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल : बैलगाडीतून रॅलीमहाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्या दालनात दुपारी पावणे दोनच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार-पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी अर्जासोबत जोडलेली संपत्ती विवरणपत्र, प्रतिज्ञापत्र यासह अपेक्षित माहिती भरली आहे का? , नोंदणीकृत पक्ष असल्याने दहा सुचकांची नावे आहेत का? याची माहिती घेऊन अर्ज दाखल करुन घेतला. जवळपास अर्धा तास ही प्रक्रिया सुरु होती. यानंतर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनीही या मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन अर्ज दाखल करण्यासाठी खा. शेट्टी सजवलेल्या बैलगाडीतून रॅलीने निघाले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदीरात जाऊन दर्शन घेतले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, भगवान काटे, सावकार मादनाईक, राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट, अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीचे योगेंद्र यादव, माकपचे नेते प्रा. उदय नारकर यांच्यासह महाआघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हलगी, कैताळाचा दणदणाट व खा. राजू शेट्टी यांच्या जयघोषात ही रॅली व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर या रॅलीचे रुपांतर नष्टे हॉल येथील सभेत झाले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर