शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘कुंभी’च्या राजकारणात राजर्षी शाहू आघाडी अभेद्य राहणार?

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

साखर कारखान्याचे राजकारण : यशवंत मंच, बचाव मंचची सवतासुभ्याची तयारी

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे विरोधी गटाची महत्त्वाची भूमिका बजावणारी राजर्षी शाहू आघाडी यावेळी अभेद्य राहणार ? यशवंत मंच व कुंभी बचाव मंच सवतासुभा मांडण्याचा हालचाली गतिमान झाल्याने निवडणूक दुरंगी की तिरंगी याविषयी ‘कुंभी’ परिसरात उत्सुकता लागली आहे. -कुंभी कासारीचा निवडणुकीचा आखाडा आतापर्यंत तुल्यबळ लढतीमुळे गाजला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डी. सी. नरके यांनी पाच वर्षांचा अपवाद वगळता कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर पकड कायम ठेवली. स्वर्गीय श्रीपतराव बोदं्रे, मारुतराव खाडे, पा. वि. पाटील, नी. आर. देसाई या दिग्गज नेत्यांना त्यांनी टक्कर दिली. डी. सी. नरके यांच्यानंतर त्यांचे विरोधक अधिक आक्रमक झाले. त्यात आमदार चंद्रदीप नरके ‘कुंभी’ च्या राजकरणात नवनवे असल्याने त्याचा फायदा उठवत राजर्षी शाहू आघाडी सत्तांतर घडविले; पण सभासदांना दिलेले आश्वासन त्यांना पाळता आले नसल्याने त्यानंतर सलग दोन निवडणुका आमदार नरके यांनी एकतर्फी जिकल्या. प्रत्येक निवडणुकीत नरके यांना शाहू आघाडीचा माध्यमातून विरोधकांनी कडवे आव्हान दिले; पण गेल्१ँ दीड वर्षांपासून ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांनी ‘कुंभी’ बचाव मंचची स्थापना करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुंभी च्या कारभारावर विविध मार्गाने टीकेचा झोड उठवून त्यांनी परिसरात वातावरण चांगले तयार केले. आंदोलनापुरती त्यांची भूमिका ठीक होती. ‘बचाव मंच’ चे काम करत असताना त्यांनी कुभीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मंच अंतर्गत सभासदाची नोंदणी करून त्यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली निवडणूक कार्य केले आहे. सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा तक्रारी आहेत. यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई यांनीही यशवंत मंचच्या माध्यमातून जुन्या जानकार लोकांना बरोबर घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी उमेदवारांची चाचपणी करत सावध हालचाली सरू केल्या आहेत. खाडे हे तरुण व नवनवे आहेत. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीचे ज्येष्ठ नेते काम करतील का? हा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. दोन्ही मंचची तयारी पाहिली, तर तिरंगी लढतीचे चित्र दिसते. तिरंगी लढत झाली, तर निवडणुकीचे काय चित्र असेल, हे समजण्यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार नाही. हे मात्र निश्चित आहे.चंद्रदीप नरकेंची सावध भूमिकाविरोधकांमध्ये दोन मतप्रवाह झाल्याने ‘कुंभी’ ची निवडणूक आमदार नरके यांच्यासाठी तशी अवघड दिसत नाही. विरोधक एकसंघ असताना त्यांनी एकहाती सत्ता हस्तगत केल्या आहेत, तरीही त्यांनी सावध भूमिका घेतली आहेत. मनोमिलनासाठी ‘पी. एन’ यांची कसोटी अ‍ॅड़ प्रकाश देसाई व बाजीराव खाडे हे दोेघेही पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे दोघांनी आता कितीही सवतासुभ्याची तयारी केली असली, तरी शेवटच्याक्षणी पाटील एकत्रित मोट बांधतील त्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की आहे.