शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

राजर्षी शाहूंचे विचार जयसिंगपूरकरांनी जोपासले

By admin | Updated: September 22, 2016 00:44 IST

शाहू महाराज : जयसिंगपूर येथे शताब्दी वर्षारंभ दिमाखात सुरू; विविध रंगारंग कार्यक्रम उत्साहात

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराचा शताब्दी प्रारंभ दिवस हा ऐतिहासिक असून, या शहराने राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची परंपरा कायम जोपासली आहे. शहराची औद्योगिक व विकासात्मक दृष्टी पाहता ज्या दूरदृष्टीने शाहू महाराजांनी हे शहर वसविले ते शाहू महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले. या शहराचा मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केले. येथील पालिकेच्या खुल्या नाट्यगृहात जयसिंगपूर शहराच्या शताब्दी वर्षारंभ समारंभात अध्यक्षस्थानावरून श्रीमंत शाहू महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमित सैनी, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून समारंभास प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू महाराज पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी चळवळीचा आहे. जयसिंगपूर शहरातील वाढती लोकसंख्या व अन्य परिसरातील गावांचा विचार करता हद्दवाढ करताना शहरवासीयांनी नेमका निर्णय घ्यावा. एकजुटीने व एकदिलाने एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करणाऱ्या जयसिंगपूरवासीयांचे कौतुक वाटते, असे सांगून त्यांनी शताब्दी वर्षपूर्ती प्रसंगी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊन कार्यक्रमही आयोजित करण्याबाबत पुढाकार घेऊ, असे सांगितले. खासदार राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर शहराला मोठा इतिहास आहे. शताब्दीच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत. अशाच पद्धतीने शताब्दी महोत्सवाचा समारोपही व्हावा. शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणाचा आदर्श घेऊन जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती झाली. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना हे वरदान ठरले आहे. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी स्वागत नगराध्यक्ष रेखा राजीव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक भाषणात पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी, गेल्या पंधरा वर्षांतील विकासात्मक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार किरण काकडे, मुख्याधिकारी हेमंत निकम, सुरेशदादा पाटील, सावकर मादनाईक, अशोकराव कोळेकर, अमरसिंह निकम, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, सतीश मलमे, सुरज भोसले, मिलिंद भिडे, विठ्ठल पाटील, शंकर बिराजदार, शैलेश आडके, रमेश शिंदे, श्रीपती सावंत, सुनील शेळके, अमरदीप कांबळे, भगवंत जांभळे, पराग पाटील, मिलिंद शिंदे, सुभाष भोजणे, डॉ. अतिक पटेल, प्रकाश झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, नंदू बलदवा, धनाजीराव देसाई, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, राजेंद्र नांद्रेकर, राजू झेले, डॉ. महावीर अक्कोळे, स्वरुपा पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष स्वाती पडूळकर, अनुराधा आडके, स्नेहा शिंदे, राजश्री जाधव, अलका खाडे, राणी धनवडे, आदी उपस्थित होते. प्राजक्ता पाटील आणि बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. अन् हशा पिकला या समारंभात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अचानक माईकचा ताबा घेऊन सातवा वेतन कधी मिळणार याचे मान्यवरांनी उत्तर द्यावे, असे विचारले. त्यावर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मीसुद्धा सातव्या वेतनाची वाट पाहत आहे, असे म्हणताच उपस्थितात हशा पिकला. झोपडपट्टीप्रश्नी लक्ष घालू शहराच्या हद्दवाढीबाबत पालिकेने दिलेल्या प्रस्तावावार ताबडतोब विचार करून निर्णय घेतला जाईल. तसेच या शिरोळ तालुक्यात जे काही कार्यक्रम होतात ते वर्षभर चालणारे असतात, राज्यात हा एकमेव तालुका असेल असे सांगून जिल्हाधिकारी सैनी यांनी झोपडपट्टी नियमित करण्याबाबत आपण पालिका प्रशासनास सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.