शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

समता रॅलीतून उलगडला राजर्षींचा जीवनपट

By admin | Updated: June 27, 2017 01:10 IST

सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजन : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रबोधनपर फलकांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय...’ असा अखंड जयघोष... आकर्षक चित्ररथांतून उलगडलेला राजर्षी शाहूंचा जीवनपट... प्रबोधनपर फलक... झांजपथकांचा दणदणाट.... लेझीम पथकांचा कलाविष्कार... असे उत्साही वातावरण सोमवारी सकाळी पाहावयास मिळाले. निमित्त होते, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता रॅलीचे. यावेळी शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला.सकाळी साडेआठच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, आदी प्रमुख उपस्थित होते.यानंतर समता रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजर्षी शाहूंचा जीवनपट शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्ररथातून उलगडण्यात आला. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या कलाविष्काराने अंगावर रोमांच उभे राहत होते. ही रॅली व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर मार्गे दसरा चौक येथे येऊन रॅलीचा समारोप झाला.स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, राजदीप सुर्वे, महादेव पाटील, आर. डी. पाटील यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, आदि मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.‘विद्यापीठ’चे लक्षवेधी प्रबोधनपर फलकया रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हातातील ‘जाणता राजा शाहू’, ‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू’, ‘राजर्षी शाहूंचा उपक्रम, प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम’ असे प्रबोधनपर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते.‘महाराष्ट्र’च्या लेझीम पथकाचा आविष्कारसमता रॅलीमध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.