शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:14 IST

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फ्राम्याकॉलॉजी (सीसीएमपी) परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्या दहा गुणवंतांच्या यादीत सहा विद्यार्थी डॉक्टर चमकले आहेत. डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

ठळक मुद्दे‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यशहर्षवर्धन अंतुरकर राज्यात प्रथम; सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फ्राम्याकॉलॉजी (सीसीएमपी) परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्या दहा गुणवंतांच्या यादीत सहा विद्यार्थी डॉक्टर चमकले आहेत. डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉ. चेतन जोशी, अभय जाधव, अमोल पाटील, बद्रुद्दीन मणेर, रवींद्र मगदूम यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षा गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला. रुग्णांचा उपचार करण्यासाठी अचूक निदान, कमीत कमी प्रतिजैविकांचा योग्य वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.

ज्ञान, अनुभवाचा रुग्णसेवेसाठी वापर करून कमीत कमी पैशांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास बांधील असल्याचे डॉ. मणेर यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम, सुनिता रामानंद, महेंद्रकुमार बनसोडे, वसंतराव देशमुख, शिरीष शानभाग, सुधीर सरोदे, सीसीएमपी कोर्सचे समन्वयक डॉ. रामा भोसले, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर