शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

‘राजाराम’चे वीज, पाणी तोडा

By admin | Updated: April 19, 2015 01:15 IST

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कारवाई : इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटनाही बंदचे आदेश

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी कसबा बावड्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन बंद करून वीज, पाणी कनेक्शन तोडावे, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी शनिवारी काढला. यासह इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही अशीच कारवाई करावी, असाही आदेश आहे. विभागीय महसूल आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून विचारणा केल्यानंतर हा कारवाईचा आदेश झाला. राजाराम कारखान्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येलाच कारवाईचा आदेश आल्यामुळे खळबळ उडाली. प्रदूषणप्रश्नी येथील महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिये (ता. करवीर) हद्दीत ५ एप्रिलला पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मृत झाल्याने प्रदूषण नियंत्रणमंडळ प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सामाजिक कार्यकर्ते व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिके च्या प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शियेपर्यंत नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला होता. राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तेथील दूषित पाण्याचे नमुने घेतले. जलप्रदूषण कायदा १९७४ व हवा प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियम २००८ नुसार कारवाईची नोटीस राजाराम कारखाना व्यवस्थापनास बजावली होती. त्याचवेळी बँक हमीची जप्तीही केली होती. दरम्यान, साखर कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याचा हंगाम ३० मार्चला संपला आहे. वजनदार राजकीय वरदहस्त असलेल्या या कारखान्याला ‘प्रदूषण’ने दणका दिला. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही जलस्रोत व अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणीच कारवाईचा आदेश झाला आहे.