शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By admin | Updated: July 17, 2017 00:15 IST

धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णात दिवसभर उघडीप आणि सायंकाळी दमदार पाऊस कोसळत आहे. रविवारी काही अपवाद वगळता दिवसभर कडकडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली असून, अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी जिल्ह्णाच्या पश्चिम भागात चांगला पाऊस आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चदंगड तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असून राधानगरी, कासारी धरणक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ६४ टक्के भरले असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद ६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले आहे. कासारी धरण ७८ टक्के भरले आहे. त्यातून २५० विसर्ग सुरू आहे. घटप्रभा, जांबरे व कोदे धरण शंभर टक्के भरले असून, त्यातून अनुक्रमे २९८०, ८११, ३४५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना फुग आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पंचगंगेची पातळी २३ फुटांवर स्थिर होती. राजाराम बंधाऱ्यातून प्रतिसेकंद १६ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे, कडक कोगे, यवलूज असे अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा, कंसात क्षमता -राधानगरी -५.३२ (८.३६१), तुळशी - २.११ (३.४७१), वारणा - १८.४७ (३४.३९९), दूधगंगा- ११.९० (२५.३९६), कासारी-२.१६ (२.७७४), क डवी-१.५६ (२.५१६), कुंभी- १.८८ (२.७१५), पाटगाव-२.२४ (३.७१६), चिकोत्रा-०.२५ (१.२५), चित्री -०.७१ (१.८८६).