शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावड्यात पावसाचा जोर,  कोल्हापूर जिल्ह्यात २१.८९ मि.मी. पाऊस : नऊ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:46 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात २१.८९ मि.मी. पाऊसगगनबावड्यात पावसाचा जोर : नऊ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन ‘राजाराम’सह नऊ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेच्या पाणीपातळीत गुरुवारी वाढ होऊन ती २० फूट पाच इंचांवर गेली.गुरुवारी सकाळपासूनच शहरासह आसपासच्या तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. गगनबावडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याखालोखाल शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत पाऊस पडला. उर्वरित तालुक्यांत पावसाचा जोर नसला तरी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहिली. शहरातही हेच चित्र होते. पावसाचे वातावरण राहिल्याने हवेत गारठाही जाणवत होता.

राधानगरी, दूधगंगा, कुंभी, घटप्रभा अशा प्रमुख धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगेच्या पाणीपातळीत बुधवार (दि. ४)च्या तुलनेत तीन फूट पाच इंचांनी वाढ होऊन गुरुवारी ती २० फूट पाच इंचांवर गेली.गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २१.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७४.५० मि.मी., तर सर्वांत कमी पाऊस शिरोळ तालुक्यात १.८५ मि.मी. झाला.

जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे बंधारे, भोगावती नदीवरील खडक-कोगे व कासारी नदीवरील यवलूज या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असाहातकणंगले (७.२५), शिरोळ (१.८५), पन्हाळा (१९.४३), शाहूवाडी (३८.८३), राधानगरी (३१.८३), गगनबावडा (७४.५०), करवीर (७.१८), कागल (१६.२८), गडहिंग्लज (७.७१), भुदरगड (१२.४०), आजरा (२३.७५), चंदगड (२१.६६).‘शित्तूर’मध्ये जनावराच्या शेडचे दहा हजारांचे नुकसानजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील धोंडिराम दादू यटम यांच्या जनावराचे शेड कोसळून, शेळीचा मृत्यू होऊन अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर