शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने कोल्हापूरला झोडपले

By admin | Updated: September 11, 2015 01:01 IST

अडीच तास संततधार : सगळीकडे पाणीच पाणी; पादचारी, फेरीवाल्यांची तारांबळ

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ््यात झाला नाही इतक्या जोरदार पावसाने गुरुवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यालाही झोडपून काढले. राधानगरी किंवा गगनबावडा या पावसाचे आगर असलेल्या ठिकाणी जसा पाऊस काहूर माजवतो, तसाच पाऊस शहरात झाला. पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते. या पावसाने धरणीमातेची कुस खऱ्या अर्थाने तुडुंब भरली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. गुरुवारी सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, असे वातावरण होते. सुरुवातीला साडेअकराच्या सुमारास शहराच्या काही भागात चांगला पाऊस झाला, परंतु त्याचे स्वरूप वळीव पावसासारखे होते. त्यानंतर थोडी उघडीप होती, परंतु पुन्हा साडेतीनच्या सुमारास आभाळ ढगांनी गच्च भरून आले. पाऊस कसा येणार याचीच चाहूल त्यातून लागली. चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. आभाळ पुरते अंधारून आले होते. कोकणात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात जसे दिवसभर वातावरण असते तसेच काहीसे वातावरण कोल्हापुरात तयार झाले होते. पावसाच्या नुसत्या सरी नव्हत्या, तर त्याने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावरून, घरावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. शहराच्या बहुतांशी भागात रस्त्यावर पाणी तुंबले होते, गटारी भरून वाहत होत्या. रस्त्यावरील गर्दी एकदम कमी झाली होती. कुठे पाहावे तिकडे नुसता पाऊस आणि पाऊसच दिसत होता. अशाच पावसाची लोकांना प्रतीक्षा होती. साडेसहा वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पादचारी, फेरीवाले, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली. त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. अनेकांनी विक्रीचे साहित्य गुंडाळून चिंब अंगाने घरी जाणेच पसंत केले.