शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, महापुराचा धोका कायम; दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटाने वाढ

By राजाराम लोंढे | Updated: July 27, 2024 17:49 IST

शिरोळ तालुक्याला पुराचा विळखा, एसटीचे २९ मार्ग बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम राहिल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढली असून, पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू केले आहे. शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसरात पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. पाऊस जरी कमी झाला असला, तरी प्रशासन सतर्क असून, पुराच्या पातळीवर नजर ठेवून आहे.शुक्रवार सकाळी उघडीप दिली आणि दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली होती. रात्रभर पाऊस राहिला, पण शनिवारी सकाळपासून उघडीप दिली आहे. दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पुराच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ सुरूच आहे. काेल्हापूर शहरातील अनेक भागांत जयंती नाल्याचे पाणी घुसले असून, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे, आरे या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे. पाणी वाढेल तसे, नागरिकांचे स्थलांतर सुरूच राहिले आहे.दरम्यान, दिवसभरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काेल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी देऊन प्रशासनाला सूचना दिल्या.

रविवारसाठी ‘यलो’ अलर्टशनिवारी पाऊस कमी झाला असून, उघडणार कधी? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. रविवारी (दि. २८) हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

अलमट्टीतून ३ लाखांचा विसर्गकोल्हापुरातील पुराची तीव्रता अलमट्टी धरणातील विसर्गावर अवलंबून असते. शनिवारी या धरणातून प्रतिसेकंद ३ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने कर्नाटक सरकारच्या सतत संपर्कात आहेत.

जिल्ह्यात ६० हजार लिटर दूध घरातजिल्ह्यात शनिवारी वाहतुकीचे बुहतांशी मार्ग बंद राहिल्याचा परिणाम दूध वाहतुकीवर झाला आहे. सरासरी ६० हजार लिटर दूध शेतकऱ्यांच्या घरातच राहिले असून, यामध्ये ‘गोकुळ’ दूध संघाला मोठा फटका बसला आहे.

पडझडीत दोन कोटींचे नुकसानजिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत चार सार्वजनिक, तर ४५० खासगी मालमत्तांची पडझड झाली होती. यामध्ये तब्बल २ कोटी २ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एसटीचे २९ मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने शनिवारी एसटीचे २९ मार्ग बंद राहिले आहेत. गडहिंग्लज व इचलकरंजी आकारातील एसटी बसचे मार्ग सर्वाधिक बंद आहेत.

दृष्टिक्षेपात शनिवारचा पाऊस

  • दिवसभरातील सरासरी पाऊस : ३५ मिलिमीटर
  • पंचगंगेच्या पातळीत वाढ : अर्ध्या फुटाने
  • सध्याची पातळी : ४७.६ फूट
  • बंधारे पाण्याखाली : ९८
  • मार्ग बंद : ८८
  • नुकसान : ४५३ मालमत्ता
  • नुकसानीची रक्कम : २ कोटी २ लाख ८५ हजार.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरTrafficवाहतूक कोंडी