शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काेल्हापूरात पावसाचा जोर वाढला; २१ बंधारे पुन्हा पाण्याखाली

By राजाराम लोंढे | Updated: July 14, 2024 14:10 IST

धरणक्षेत्रात धुवांधार

राजाराम लोंढे, कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरु असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडूंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दुपारपर्यंत दोन फुटाने वाढली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरु झाला, रविवारी सकाळ पासून जोर काहीसा वाढला असून दिवसभर संततधार सुरु आहे. धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ होत आहे. पुर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यातच राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १३०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सर्वच नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १८ फुटापर्यंत होती, दुपारी दीड वाजता २० फुटापर्यंत पोहचली होती. दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाच ‘सर्कल’मध्ये अतिवृष्टी

रविवारी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ‘करंजफेण’, ‘आंबा’, ‘मलकापूर’, गगनबावडा व कडगाव या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस