शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, धरणातील विसर्गाने नद्यांची फूग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:34 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली. पाऊस कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने नद्यांची फूग कायम आहे. अद्याप ४९ बंधारे पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, धरणातील विसर्गाने नद्यांची फूग कायम ४९ बंधारे पाण्याखाली असल्याने वहातूक विस्कळीत

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली. पाऊस कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने नद्यांची फूग कायम आहे. अद्याप ४९ बंधारे पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.गेले चार -पाच दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली. सकाळी पावसाची भुरभुर राहिली पण त्यानंतर उघडीप होती. दुपार नंतर पावसाची रिपरिप राहिली तरी गेले दोन-तीन दिवस असणारा जोर दिसला नाही. पण धरणक्षेत्रात अद्याप पाऊस असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

राधानगरी धरणाचा क्रमांक सहाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून प्रतिसेंकद ३०२८ , वारणातून ९७६५ तर दूधगंगेतून ८ हजार घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून प्रतिसेंकद ३० हजार ७१४ घनफुट पाणी विविध नद्यांमध्ये मिसळत असल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी रविवार पेक्षा अर्धा फूटाने वाढली आहे. सध्या पंचगंगा ३३.६ फुटावरून वाहत आहे. विविध नद्यांवरील तब्बल ४९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वहातूक काहीसी विस्कळीत झाली आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यात झाला आहे. हातकणंगले (४.७५), शिरोळ (२.८५), पन्हाळा (१२.८६), शाहूवाडी (४४), राधानगरी (२०.१७), गगनबावडा (४४), करवीर (९.६३), कागल (१३), गडहिग्लज (४.८५), भुदरगड (१६.२०), आजरा (१३), चंदगड (१६.६७).

पडझडीत साडे चार लाखांचे नुकसानसोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात १६ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये साडे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर