शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी गॅस’च्या विजेवर धावणार रेल्वे

By admin | Updated: June 8, 2015 00:46 IST

पीयूष गोयल : रेल्वेशी होणार करार; १५ जूनपासून वीजनिर्मिती सुरू

रत्नागिरी : सध्या बंद असलेल्या दाभोळ-अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस विद्युत निर्मिती प्रकल्पात १५ जून २०१५ पासून काही प्रमाणात वीजनिर्मिती सुरू होणार आहे. या विजेवर रेल्वे धावणार असून, वीज खरेदीबाबत कंपनी आणि रेल्वे यांच्यात लवकरच करार होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिली.संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गाव गोयल यांनी दत्तक घेतले आहे. गावच्या पाहणीसाठी तसेच तेथील कार्यक्रमासाठी ते रविवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्प हा गॅसवर अवलंबून आहे. या प्रकल्पासाठी आता गॅस उपलब्ध झाला आहे. प्रथम काही प्रमाणात विजेचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू होईल. या कंपनीशी संबंधित चार वित्तीय संस्था व महाराष्ट्र शासन यांच्यात चर्चा सुरू आहे. या प्रकल्पाची निर्मिती क्षमता वाढविण्याचाही प्रयत्न आहे. त्यातून ही कंपनी आर्थिकबाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा शासनाचा मानस आहे. या कंपनीतून निर्माण होणारी वीज ही ४.७० पैसे युनिट दराने रेल्वेला दिली जाणार आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला वीज उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. देशाने गेल्या वर्षभरात विद्युत, कोळसा उत्पादनात प्रगती केली आहे. रत्नागिरी गॅस कंपनी सुरू होणार ही आणखी एक उपलब्धी आहे. गतवर्षी विद्युत उत्पादनात ८.४ टक्के, तर कोळसा उत्पादनात ८.२ टक्के वृद्धी झाली आहे. १ एप्रिल २०१५ पासून ५ जून २०१५ या ६७ दिवसांच्या काळात कोळसा उत्पादनात ११.९ टक्के वाढ झाली आहे. २०१९ पर्यंत देशाचे वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)