शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सराफ संघातर्फे रेल रोको

By admin | Updated: April 1, 2016 01:30 IST

अबकारी कर, पॅनकार्ड सक्ती : सराफ संघाचे २९ व्या दिवशी आंदोलन कायम; ४ एप्रिलपर्यंत बंद

कोल्हापूर : अबकारी कराच्या निषेधार्थ आणि पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघातर्फे गुरुवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वेस्थानकात निदर्शने करून ‘रेल रोको’ आंदोलन केले. २९ व्या दिवशीही बंद कायम ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघातर्फे करण्यात आला आहे. हे आंदोलन ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.केंद्र सरकारने सोन्याच्या दागिने उत्पादनांवर लावलेल्या एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा २९ दिवस देशव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेतील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून सराफांनी संपात सहभाग नोंदविला आहे. देशपातळीसह जिल्हा पातळीवरही विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा सराफ व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. शहर व जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही विविध आंदोलने करून बंदची व्याप्ती वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सराफ, सुवर्णकारांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी रेल्वे स्टेशन प्रबंधक मीना सुग्रीव यांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे नियोजित वेळेनुसार जर सुटली नाही, तर आंदोलनकर्त्यांवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करणे अटळ आहे. अशी आंदोलनकर्त्यांना सूचना देताच हे आंदोलन ११ वाजता घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी ‘एक्साईज रद्द झाला पाहिजे’, अशा लिहिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या. त्यामुळे ११ वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शाहू टर्मिनन्समधून सुटणारी कोल्हापूर तिरुपती-हरिप्रिया एक्सप्रेस ही रेल्वे नियोजित वेळेत सुटली. रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, जिल्हाध्यक्ष अमोल ढणाल, उपाध्यक्ष केरबा खापणे, पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, सचिन देवरूखकर, संभाजी नाळे, राजाराम पाटील, अरुण पाटील, अमोल नागवेकर, मधुकर बुवा, विलास बावणे, मोहन माळी, सुनील म्हेतर, सुधाकर पाटील, महेश साजणीकर, महेश पोरे, राजकुमार शेटके, किरण गवाणकर, रमेश कारेकर, संजय पोतदार, रवींद्र पोतदार, नामदेव मांगले, विजय बांदिवडेकर, संजय मालंडकर, शशिकांत पाटील, आदी सदस्य व सराफ, सुवर्णकार, कारागीर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा सराफ संघातर्फे रेल रोको अबकारी कर, पॅनकार्ड सक्ती : सराफ संघाचे २९ व्या दिवशी आंदोलन कायम; ४ एप्रिलपर्यंत बंदकोल्हापूर : अबकारी कराच्या निषेधार्थ आणि पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघातर्फे गुरुवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वेस्थानकात निदर्शने करून ‘रेल रोको’ आंदोलन केले. २९ व्या दिवशीही बंद कायम ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघातर्फे करण्यात आला आहे. हे आंदोलन ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.केंद्र सरकारने सोन्याच्या दागिने उत्पादनांवर लावलेल्या एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा २९ दिवस देशव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेतील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून सराफांनी संपात सहभाग नोंदविला आहे. देशपातळीसह जिल्हा पातळीवरही विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा सराफ व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. शहर व जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही विविध आंदोलने करून बंदची व्याप्ती वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सराफ, सुवर्णकारांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी रेल्वे स्टेशन प्रबंधक मीना सुग्रीव यांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे नियोजित वेळेनुसार जर सुटली नाही, तर आंदोलनकर्त्यांवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करणे अटळ आहे. अशी आंदोलनकर्त्यांना सूचना देताच हे आंदोलन ११ वाजता घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी ‘एक्साईज रद्द झाला पाहिजे’, अशा लिहिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या. त्यामुळे ११ वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शाहू टर्मिनन्समधून सुटणारी कोल्हापूर तिरुपती-हरिप्रिया एक्सप्रेस ही रेल्वे नियोजित वेळेत सुटली. रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, जिल्हाध्यक्ष अमोल ढणाल, उपाध्यक्ष केरबा खापणे, पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, सचिन देवरूखकर, संभाजी नाळे, राजाराम पाटील, अरुण पाटील, अमोल नागवेकर, मधुकर बुवा, विलास बावणे, मोहन माळी, सुनील म्हेतर, सुधाकर पाटील, महेश साजणीकर, महेश पोरे, राजकुमार शेटके, किरण गवाणकर, रमेश कारेकर, संजय पोतदार, रवींद्र पोतदार, नामदेव मांगले, विजय बांदिवडेकर, संजय मालंडकर, शशिकांत पाटील, आदी सदस्य व सराफ, सुवर्णकार, कारागीर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)