शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:01 IST

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील रो हाऊससह महेश फळणीकरच्या आजरा येथील घरावर मुंबई पोलिसांनी शनिवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले.

कोल्हापूर/आजरा - महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील रो हाऊससह महेश फळणीकरच्या आजरा येथील घरावर मुंबई पोलिसांनी शनिवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले.चार तास घरझडती सुरू होती. कुरुंदकरच्या बंगल्यावरील महिला सफाई कामगारासह फळणीकरचे वडील, भाऊ, पत्नी यांचे जबाब घेतले. दोन्ही ठिकाणांहून काही साहित्य जप्त केले असून, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते.गेल्या २ वर्षांपासून कुरुंदकरच्या संपर्कात असणाºया कोल्हापूर पोलीस दलातील दोघा पोलिसांची मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांनी कसून चौकशी केली.अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरुंदकर (भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरुंदकरचा कारचालक कुंदन भंडारी (रा. भंडारी हाऊस, बंदरपाडा, कांदिवली, मुंबई), महेश फळणीकर (रा. आजरा जि.कोल्हापूर) या चौघांना अटक केली आहे. फळणीकरने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली आहे. बिद्रे यांच्या खुनाचा कट कुरुंदकरने आजºयातील हाळोली येथील फार्म हाउसवर रचल्याचा संशय आहे. शरीराचे तुकडे केलेल्या इलेक्ट्रिक कटरची विल्हेवाट आजरा-कोल्हापूर परिसरात लावली आहे.तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी दोन पथके स्थापन करून एकाच वेळी छापे टाकले. कोल्हापुरातील बंगला कुरुंदकरची पत्नी आरतीच्या नावे असून, सहा महिन्यांतून एकदा कुरुंदकर कुटुंबांसह या ठिकाणी येत असतो.कटरबद्दल माहिती नाहीअश्विनी यांच्या मृतदेहाचे वूडकटरने तुकडे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो कटर कुठे आहे, याची माहिती महेश फळणीकर याला आहे. त्याला विश्वासात पथकाने विचारणा केली; परंतु त्याने कटरसंबंधी तोंड न उघडल्याने दिवसभर शोध लागला नाही.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणCrimeगुन्हा