कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भपकेबाजपणा टाळून गोरगरिबांची मदत करावी, या देशपातळीवरील आवाहनास अनुसरून कोल्हापुरातही कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी गरजूंना मदत देऊन साजरा केला गेला. जिल्हा युवक कॉंग्रेसने याकामी विशेष पुढाकार घेत उपेक्षितांच्या घरी जीवनावश्यक साहित्य असणारे किट पोहचवण्यात आले.
प्रदेश कॉंग्रेसचे सचिव तौफीक मुल्लाणी, अध्यक्ष दीपक थोरात, अभिषेक मिठारी विजयानंद पोळ, सर्फराज रिकीबदार, विनायक पाटील, जकी मुल्ला, अक्षय शेळके, अनिकेत कांबळे, वैभव देसाई, मकरंद कवठेकर, आनंदा करपे, प्रशांत गणेशाचारी, अनुप लोंढे, युवराज पोवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
चौकट
महिला कॉंग्रेसच्या अनोख्या शुभेच्छा
गॅस, इंधन, खाद्य तेलाच्या भाववाढीसह महागाईला कारणीभूत असलेल्या मोदी सरकारचा निषेध करून जिल्हा महिला कॉंग्रेसतर्फे राहुल गांधी यांचा अनाेख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. निदर्शने, प्रतीकात्मक चुलीवर विनातेलाचे पदार्थ बनवून वाटप करण्यात आले. यात शहराध्यक्ष संध्याताई घोटणे, मंगला खुडे, शुभांगी साखरे, उज्ज्वला चौगुले, शिवानी यादव, मालती ढाले, पद्मिनी माने, सोनालिका सोकासने यांनी सहभाग घेतला.
१९०६२०२१-कोल-काँग्रेस मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भपकेबाजपणा टाळून गोरगरिबांची मदत करावी या देशपातळीवरील आवाहनास अनुसरून कोल्हापुरातही कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस गरजूंना मदत देऊन साजरा केला गेला.