कोल्हापूर : जिल्ह्णात रविवारी अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस झाला असून धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ९९ टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरण पूर्ण क्षमतेने भरेल. गेले दोन दिवस जिल्ह्णात ढगाळ वातावरण आहे पण पावसाला ताकद लागेना. रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर पुन्हा पावसाची उघडीप राहिली. दुपारी तीननंतर पावसाची रिपरिप सुरू झाली, अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात सरासरी ५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात २० मिलीमीटर तर शाहूवाडीत १३ मिलीमीटर झाला आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस असून राधानगरी धरण ९९ तर वारणा ९४ टक्के भरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ७८१ घनफूट , दूधगंगेतून ४०० घनफूट विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरण कोणत्याही क्षणी भरणार
By admin | Updated: August 24, 2015 00:35 IST