शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

राधानगरीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

शेतकऱ्यांची गैरसोय : पर्यवेक्षकांकडून सेवा

सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील श्रेणी-१ मधील मंजूर असलेली सर्वच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केवळ सहा पशुधन पर्यवेक्षकांकडून पशुवैद्यकीय सेवा सुरू आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वैद्यकीय सेवा देताना तारांबळ होत आहे. तर आवश्यक वेळेवरील उपचारांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी होत आहे.राधानगरी तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. तालुक्यात सध्या ६७ हजार पशुधन आहे. तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सर्वच गावांतील जनावरांना वैद्यकीय सेवा देणे अशक्य होते. त्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी पशुधनाची संख्या झपाट्याने वाढली आहे.तालुक्यात सरवडे, घोडवडे, कसबा वाळवे, कसबा तारळे, ठिकपुर्ली, राशिवडे, सोळांकूर, तळाशी या आठ केंद्रांवर पशुधन विकास अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. या केंद्रांतून आसपासच्या दहा गावांतील पशुधनावर उपचार केले जातात. याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी, पर्यवेक्षक असणे आवश्यक आहे. राधानगरी, शिरगाव, धामोड, आणाचे ओलवण या ठिकाणी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक कार्यरत आहेत. त्यांची या व्यतिरिक्त १४ उपकेंद्रांवर सेवा देताना तारांबळ उडत आहे. आठवड्यातील एक दोन दिवस असे कामाचे नियोजन करून ते पशुवैद्यकीय तपासणी करीत आहेत. त्यामुळे इतरवेळी वैद्यकीय दवाखाने बंद राहतात. वेळेत जनावरांच्या उपचारासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने गोकुळ दूध संघाच्या अथवा खासगी डॉक्टरांचा आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. अधिकाऱ्यांविना शासनाच्या कामधेनू दत्तक ग्रामयोजना, विविध आजारांचे लसीकरण निर्मूलन शिबिरे, आदी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यावर्षी सोळांकूर, सरवडे, पालकरवाडी, मजरे, कासारवाडा, राशिवडे, आमजाई व्हरवडे, पडळी, तुरंबे ही गावे कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सहभागी झाली आहेत. ही योजना राबविण्यासाठी पशुधन विकास अधिकारी भरण्याची आवश्यकता आहे. ही पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर तांत्रिक कामे अपूर्ण राहत असून, योग्य ती उपचारपद्धती, शासनाच्या सर्वच विविध योजना, शिबिरे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात विलंब होत आहे. ही पदे भरल्यास कारभार सुरळीत चालेल. - डॉ. प्रदीप भोरे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती राधानगरी.