शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी-निपाणी राज्यमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

वाहतुकीसाठी धोकादायक : साडेचार वर्षांत ३२ जण ठार, तर १३६ जण जखमी; दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे नाहीत

रमेश वारके -बोरवडे- राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनत आहे. या रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या साडेचार वर्षांपासून एप्रिल २०१५ अखेर झालेल्या अपघातात ३२ जण ठार झाले आहेत, तर १३६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि एका स्त्रीचा समावेश असून, जखमींमध्ये १२१ पुरुष, १० स्त्रिया व पाच लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग नेहमीच वाहतुकीच्यादृष्टीने गजबजलेला आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवासीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. किंबहुना, पादचारी लोकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कोकणातून फोंडाघाटमार्गे राधानगरी-निपाणी मार्गावरून बेळगावकडे जाणारी वाहनेही मोठ्या संख्येने आहेत. या मार्गावर झालेल्या अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. भरधाव वेगाने होणारी बॉक्साईटची जीवघेणी वाहतूक, मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक, तीव्र वळणे, या वळणावर नसलेले दिशादर्शक फलक, अनेक मोहऱ्यांवरती नसलेले संरक्षक कठडे, चालकांचे चाललेले मोबाईलवरील संभाषण, अशी अनेक कारणे अपघातास कारणीभूत ठरली आहेत. अनेक अपघातात बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपद्री नसल्याने डोळ्यांत कण जाऊन डोळ्यांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात टाळायचे असतील, तर सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच वाहतूक विभागानेही काटेकोरपणे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या मार्गावर वाहने इतकी वेगात असतात की, प्रवासी वर्गाला प्रवास करताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहनांचा वेगही मोठ्या प्रमाणात असून, वळणावरून जाताना अंदाज न आल्याने अपघात होणे, त्याचबरोबर ओव्हरटेक करतानाही चालकांनी काळजी न घेतल्याने अपघात झाल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.या मार्गावर २०११ मध्ये मुरगूड पोलीस ठाण्यात २९ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टर अपघातात चार पुरुष, मोटारसायकल-चारचाकी अपघातात एक पुरुष व एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे . तर ३६ पुरुष, दोन स्त्रिया व एक लहान मुलगा जखमी झाला आहे. २०१२ मध्ये ३८ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात तीन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात आठ पुरुष मृत झाले आहेत. तर २५ पुरुष व एका स्त्रिचा जखमींमध्ये समावेश आहे.२०१३ मध्ये ४२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात चार पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३८ पुरुष, तीन स्त्रिया, तीन लहान मुले जखमी झाली आहेत. २०१४ मध्ये २२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी-चारचाकी अपघातात सहा पुरुषांचा मृत्यू झाला असून, जखमींमध्ये १२ पुरुष, दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. एप्रिल २०१५ पर्यंत आठ अपघातांची नोंद झाली असून, दुचाकी अपघातात एक पुरुष मृत झाला असून, दोन पुरुष व एका स्त्रीचा जखमींमध्ये समावेश आहे.वाहन चालवित असताना चालक मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. वळणावर व पुढेही वाहन चालवित असताना वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान मुलांच्या हाती गाड्या देऊ नयेत.- तुकाराम सूर्यवंशी, वाहतूक पोलीस नियंत्रकया मार्गावर अनेक वळणे असून, वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वळणावर ओव्हरटेक करण्याचे प्रमाण खूप असल्याने अपघात होतात. जीव धोक्यात घालून येथे प्रवास करावा लागत आहे. चालकांनी वाहन नियंत्रित चालवून अपघात टाळावेत. - एम. आर. फराकटे, स्थानिक रहिवाशी