शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रा. कृ. कणबरकर यांचे निधन

By admin | Updated: April 14, 2015 01:24 IST

ज्ञानतपस्वी : कोल्हापुरात आज अंत्यसंस्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी रा. कृ. कणबरकर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास भोगावती (ता. करवीर) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. कणबरकर यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा डॉ. अरुण, मुली डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे, डॉ. नमिता खोत, सून डॉ. सुवर्णा यांच्यासह जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची आयटीआयसमोरील नाळे कॉलनी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून, पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. कृ. कणबरकर हे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्याकडे भोगावती येथे राहत होते. या ठिकाणीच सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना शोक अनावर झाला. कणबरकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. रा. कृ. कणबरकर हे मूळचे बेळगाव येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. नंतर ते कऱ्हाडच्या एस. जी. एम. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे, कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे, तसेच न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. तेथून त्यांची १९८० साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झाली. कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक समित्यांवर काम केले. येथून ते १९८३ साली निवृत्त झाले. कणबरकर यांना शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला होता. शाहू मेमोरियल ट्रस्टचे ते २५ वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यांना सन्मानाचा ‘शाहू’ पुुरस्कारही मिळाला होता. त्यांनी बाबूराव धारवाडे यांच्यासमवेत भाई माधवराव बागल विद्यापीठाची स्थापना केली. सध्या ते ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (प्रतिनिधी)