शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: October 24, 2015 00:37 IST

आजरा शहर : २००८ ची पुनरावृत्ती टळली; अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लागण्याची गरज

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --मंगळवारी सायंकाळी दुचाकी पार्किंगवरून वाहनचालक व पोलीस निरीक्षक यांच्यात झालेल्या वादग्रस्त प्रकरणामुळे २००८ची पुनरावृत्ती टळली असली, तरी प्रकरणाचे मूळ पाहिल्यास आता पुन्हा एखादे प्रकरण घडण्याआधी शहरातील वाहतुकीचा, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरामध्ये वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर आजरा ग्रामपंचायत, पोलीस खाते, महसूल यांची वारंवार बैठक झाली. चर्चेचे गुऱ्हाळही झाले. प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य, असाच प्रकार राहिला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यात असणारी अतिक्रमणे तसेच रस्त्याशेजारी चारचाकी व दुचाकी उभी असणारी वाहने अक्षरक्ष: डोकेदुखी ठरतात.याच कारणावरून वाहनचालक, पादचारी यांच्यात वारंवार वाद होताना दिसतात. हाच वाद मंगळवारी पोलीस निरीक्षक व संबंधित दुकानदार यांच्यात झाला; पण पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटले. पंधरवड्यापूर्वी गणेश मंडळावर डॉल्बीप्रकरणी झालेली कारवाई, स्थानिक नेतेमंडळींना पोलीस निरीक्षकांकडून न दिली जाणारी किंमत. नवरात्रौत्सवातील कार्यक्रमानंतर कायद्याच्या बडग्यामुळे येणाऱ्या मर्यादा व पोलीस दलातीलच काही मंडळींकडून पोलीस निरीक्षकांबाबत व्यक्त केली जाणारी नाराजी, या सर्वांची परिणती नागरिक रस्त्यावर उतरण्यामध्ये झाली. या घटनेला वेगळे वळण लागण्यापूर्वीच उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील व ज्येष्ठ नेते बाबूराव कुंभार यांनी सावध भूमिका घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.चूक कोणाची? या प्रश्नाचे उत्तर चौकशीअंती मिळेलच; पण वाहतुकीतील अडथळा हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग आहे, हे नाकारता येत नाही. जोपर्यंत वाहतुकीचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार. फरक एवढाच असेल की, कधी वाहनचालक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, दुकानदार व कधी पोलीस, वाहनधारक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, तर कधी पोलीस व वाहनधारक असाच आहे.हल्ला कुणाचा ?जमावाच्या मध्यभागी असणाऱ्या तक्रारदार कृष्णा इंदलकर यांचा मुलगा सचिन याच्या डोक्यावर जमावातीलच एकाने जोरदार वार करून त्याला जखमी केले. यामुळे जमावातील काही मंडळी प्रकरणाला वेगळे वळण लावण्याच्या प्रयत्नात होते, असेही पुढे येत आहे.