शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कागल पालिका दुकानगाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:25 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. व्यापारी वर्ग ही अनामत भरू शकणार नाही, असे सांगितले आहे. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आपले गाºहाणे त्यांना सांगितले आहे.नगरपालिकेने वेळोवेळी विविध योजनांमधून शहरात व्यापारी संकुले उभारली आहेत. जवळपास १६० अशी दुकाने आहेत. मात्र यापैकी दहा टक्के दुकानगाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर काही दुकानगाळे नेहमी बंद असतात. पण त्याचे भाडे संबंधित गाळाधारक रितसर अदा करतो. जेथे दुकानगाळ्यांना महत्त्व आहे, मात्र जेथे व्यापार होत नाही तेथे भाडेकरू मिळणेही मुश्किल होते. तसेच भाडेपट्टी आणि अनामत रक्कम किती असावी हे ठरविण्याचा अधिकार नगररचना कार्यालयाला आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या रकमेवर दुकानगाळा घेण्यास कोणी तयार होत नसल्याने पालिकेने काही ठिकाणी तडजोडीने भाडेपट्टी आकारली आहे. मात्र आता कागलची विकसित झालेली बाजारपेठ लक्षात घेऊन प्रशासनाने अनामत रक्कम नव्याने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.दुकानगाळ्यांचे आर्थिक आॅडिट होणे गरजेचेकागल नगरपालिकेचे महात्मा फुले मार्केट आता जीर्ण झाले आहे. तेथे वार्षिक भाडे सात ते आठ हजार आहे. तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्यासमोर अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल, काकासाहेब वाड्यासमोरचे संकुल, नगरपालिका मुख्य इमारतीजवळ, रिंंगरोडवरील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू व्यापार संकुल, सुभाष चौक, घरकुल, जयसिंगराव पार्क येथे ही दुकानगाळे आहेत. ठिकठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नगरपालिकेने गाळाधारक, लोकप्रतिनिधी आदींची एक समिती नेमून याबद्दल आर्थिक आॅडिट करावे, अशी मागणी होत आहे.