शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

निवडणुकीत भाजपला मुळासकट उपटून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:07 AM

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. ...

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे जनआक्रोश मेळावा झाला. यावेळी हजारो शेतकºयांनी घोषणाबाजी आणि मनोगताद्वारे सरकारचा निषेध करून आपल्या एकीची वज्रमूठ कायम राखण्याची शपथ घेऊन आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा ठाम निर्धार व्यक्त केला.धामणी खोरे विकास कृती समितीच्या माध्यमातून हा जनआक्रोश मेळावा झाला. या मेळाव्यात हजारोंच्या समुदायाने प्रचंड घोषणाबाजी केली. येथील गावागावांतील निवडणुकांवर बहिष्काराचे ठराव धामणी विकास कृती समिती व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले असून, हजारो शेतकºयांच्या स्वाक्षºयांचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्यासह जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.पाणी पाणी म्हणत अनेक पिढ्या संपल्या; पण पाणी काही आलेच नाही. रखरखलेले जीवन आणि खुरटलेले संसार घेऊन जगणाºया धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान आमच्या पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्घार होईल का? मायबाप सरकारचं इतके निष्ठूर का झाले असावे, अशाअनेक प्रश्नांची सरबत्ती करत शासनाप्रती धुंदवडे येथे जनतेने आक्रोश केला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकउपस्थित होते.तब्बल १८ वर्षे धामणी प्रकल्प रखडल्याने येथील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाच्या प्रचंड बेफिकिरीमुळे या खोºयातील शेतकºयांना पाणी पाणी करावे लागत आहे. पावसाळयात अतिवृष्टी, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना अशा दुहेरी संकटात या खोºयातील शेतकरी सापडला असून, शेती व्यवसाय आतबट्टयाचा झाला आहे.सन २००० मध्ये ३.८५ टीएमसी साठवण क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. दोन तीन वर्षे चाललेले काम वगळता आजवर हा प्रकल्प रखडलेलाच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा निघाली नसल्याने प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. अनेकदा आंदोलने करूनही येथील लोकांच्या न्याय मागणीला शासनाने केराची टोपलीच दाखविली. त्यामुळे ६० गावांतील जनतेने धामणी धरणाचे काम चालू होत नाही, तोपर्यंत पुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.‘लोकमत’मधील लेखाची चर्चा‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारच्या अंकात ‘जागर’ या सदरामध्ये लिहिलेल्या ‘निवडणुकांवर बहिष्कार हा पर्याय आहे का?’ या लेखाची चर्चा धुंदवडे येथे मेळाव्यात सुरू होती. अनेकांनी या लेखाचे कौतुक केले. वक्त्यांनी आपल्या भाषणात हा लेख अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. धामणीवासीयांच्या पाठीशी नेहमी राहिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.