शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पालिका जळाल्याने कागलकरांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:49 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिकेच्या मुख्य इमारतीस लागलेल्या आगीच्या घटनेने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. जळालेली इमारत आणि त्याची दिसणारी भीषणता पाहून पालिकेशी संबंधित सारेच घटक हवालदिल झाल्याचे चित्र दुसºया दिवशी पाहावयास मिळाले. या घटनेने कागलकरांचे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची झालेली हानी, जळलेले ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिकेच्या मुख्य इमारतीस लागलेल्या आगीच्या घटनेने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. जळालेली इमारत आणि त्याची दिसणारी भीषणता पाहून पालिकेशी संबंधित सारेच घटक हवालदिल झाल्याचे चित्र दुसºया दिवशी पाहावयास मिळाले. या घटनेने कागलकरांचे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची झालेली हानी, जळलेले फर्निचर, अन्य साहित्य आणि महत्त्वाचे रेकॉर्ड, कागदपत्रे या अनुषंगाने नगरपालिका आणि कागलकरांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या नगरपालिकेत आग लागण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. दोन मजले आणि तळमजला असणाºया या भव्य इमारतीत मधल्या मजल्यावर आग लागली. येथे संवेदनशील बनलेला बांधकाम विभाग होता. तसेच याच ठिकाणी घरकुल आणि अन्य लाभार्थी योजनांची कार्यवाही होत असे. सुदैवाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष केबिन खाली आहे. तळभागात करवसुली आहे. मात्र, जी कागदपत्रे जळाली ती खूप महत्त्वाची होती. बांधकाम परवाने, विविध मागणी अर्ज, गुंठेवारी, बांधकाम प्रस्ताव, बिले रेकॉर्डस्, लाभार्थींची कागदपत्रे, विवाह नोंदणी प्रस्ताव, घरकुलाबद्दलची कागदपत्रे, ठेकेदारांची बिले, आदींचा यात समावेश आहे. विविध नोंदी, आराखडे, नकाशे तसेच जुन्या फाईल्स, टिप्पणी, शेरे, अहवाल, बिले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कागलकरांसाठी हा मोठा मानसिक धक्का आहे. अनेक दिवस या घटनेचे पडसाद उमटत राहतील.दोष कोणाचा,शिक्षा कोणाला ?आग कशामुळे लागली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, पालिकेतील सत्ताधारी गट आणि प्रशासनाला याची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही. अपघात हा अपघात असला तरी रात्री सुरक्षारक्षक नसणे, फायर आॅडिट न करणे, पुरेशी खबरदारी न घेणे, आपत्ती व्यवस्थापन नसणे हे मुद्दे कसे नाकारणार? विद्युत विभागाला कामचलाऊ विभागप्रमुख देणे हे कशाचे द्योतक आहे? असे अनेक विषय या आगीच्या निमित्ताने चव्हाट्यावर येणारे आहेत. यामुळे सामान्य जनतेलाच शिक्षा मिळणार आहे.क्लोरीन वायूगळतीची आठवण ?२००२ मध्ये येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्धिकरणासाठी उपयोगात आणावयाच्या क्लोरीन वायूच्या गळतीने ‘हाहाकार’ माजला होता. सुदैवाने तेव्हा आणि आताही कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र, पालिकेतील प्रशासन आणि कारभारी मंडळींनी योग्य ते धडे घेतलेले नाहीत. अजूनही अनेक इमारती, विभागात मनमानी, हलगर्जीपणा आणि मग्रुरी कायम आहे.नागरिकांना दिलासा देण्याची गरजपालिकेची इमारत नव्याने उभी करावी लागेल. सध्या सत्ताधारी गटाकडे तितका निधी नाही. शासनाच्या निधीसाठी सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांनी एकत्र गेले पाहिजे. या घटनेकडे राजकीय कुरघोडी म्हणून पाहता कामा नये. सर्वांत महत्त्वाचे कागदपत्रांची नव्याने जोडणी. यात सर्वच घटक आहेत. सामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून ही पूर्तता केली पाहिजे. जनतेला दिलासा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय समितीही नेमली पाहिजे, अशी मागणी होत आहे.