शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राजे संघर्षातील धुमाळ यांच्या सत्कारासाठी पुरुषोत्तम सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:47 IST

सातारा : सुरुचि बंगल्यावर उद्भवलेला प्रसंग अत्यंत काळजीपूर्वक हाताळला.

ठळक मुद्देमाजी पोलिस अधिकारी म्हणून केला गौरव; प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्रकोणत्याही क्षणी गंभीर गुन्हा घडून महाराष्ट्रभर त्याची झळ पोहोचली असती. याची जाणीव ठेवून

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सुरुचि बंगल्यावर उद्भवलेला प्रसंग अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. जखमी असूनही जीवाची पर्वा केली नाही. असे जिगरबाज पोलिस अधिकारी किशोर धुमाळ यांचा पुरुषोत्तम जाधव यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी भावनावश झालेल्या धुमाळ यांनी घडलेला प्रसंग उपस्थितांसमोर कथन केला.

सातारा शहर व आनेवाडी टोलनाका शासकीय विश्रामगृह याठिकाणी खासदार, आमदार समर्थक एकमेकांसमोर ठाकले. त्यामुळे संपूर्ण वातावरण संघर्षमय झाले होते. अशावेळी पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे जमावाला काबू करणे अशक्य झाले होते.तरीही पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी जीवाची बाजी लावून लोकप्रतिनिधी व जनतेचे संरक्षण केले. पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचे दाखवून दिले. यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘मी एक माजी पोलिस अधिकारी असल्यामुळे मला धुमाळ यांचा अभिमान आहे. त्यामुळे जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली.’ सुरुचि बंगला याठिकाणी कोणत्याही क्षणी गंभीर गुन्हा घडून महाराष्ट्रभर त्याची झळ पोहोचली असती. याची जाणीव ठेवून पोलिस निरक्षिक धुमाळ यांनी दाखविलेले प्रसंगावधान हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून हा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जय खुडे, हर्षल जाधव, मंगेश गुरव, देवराज खंडाईत व सागर भोगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उदयनराजे यांच्या विरोधात खासदारकीला अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव उभे राहिले होते.