शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

पंचगंगेत टाकलेले निर्माल्य संबंधितांकडून बाहेर काढून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 16:56 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून ...

ठळक मुद्देप्रदूषण रोखण्याबाबत त्याचे प्रबोधनही करण्यात आले. संबंधित व्यक्तीने माफी मागितली.

कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणा-या या अधिका-याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने, औद्योगिक वसाहती बंद असल्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. याच दरम्यान पंचगंगा घाटावर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हताm त्यामुळे परिसर स्वच्छ बनला आहे. येथून पुढेही नदी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. तसेच महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सक्रीय झाली आहे. याची प्रचिती बुधवारी (दि. ६) आली. फुलेवाडी परिसरातील पांडुरंग पाटील यांनी बुधवारी दुपारी पंचगंगा नदीत निर्माल्य टाकले.

याचवेळी महापालिकेतील आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी संबंधित व्यक्तीला समज दिली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच नदीत टाकलेले निर्माल्यही त्याला काढून घेण्यास भाग पाडले. प्रदूषण रोखण्याबाबत त्याचे प्रबोधनही करण्यात आले. संबंधित व्यक्तीने माफी मागितली. 

लॉकडाऊनमध्ये पंचगंगा नदीघाटावर विशेष लक्ष दिले जात आहे. बुधवारी एकाने नदीत निर्माल्य टाकले. ‘नदी किती स्वच्छ दिसते. कायम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे,’ अशा शब्दांत त्याला समज देण्यात आली. दंड वसूल करण्याबरोबरच त्याच्याकडूनच टाकलेले निर्माल्य बाहेर काढून घेण्यात आले.अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका