शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पूजा अन् गीतासाठी सरसावले अनेक हात!

By admin | Updated: April 18, 2015 00:06 IST

‘लोकमत’ची दखल : उपचारासाठी कोल्हापूरला नेले--लोकमतचा प्रभाव

भुर्इंज : अतिगंभीर भाजूनही उपचाराविना स्वत:च्या झोपडीत तडफडणाऱ्या पूजा व गीताची करुण कहाणी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह थेट परदेशातून मदतीचे हात सरसावले आहेत. मदतीचे हात पुढे करणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, अधिकारी यांच्यापासून भारताच्या राजदूतांचा समावेश आहे. मात्र, ज्या गावात पूजा व गीता भाजल्या त्या ओझर्डेतील ग्रामस्थ व यात्रा कमिटीने या दोघींना ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी रुग्णालयात दाखल केले आहे.तब्बल दहा दिवसांपूर्वी ओझर्डे, ता. वाई येथे यात्रेच्या छबिन्यात दारूकामावेळी झालेल्या स्फोटात पूजा रामदास पवार (वय ५) आणि गीता रामदास पवार (वय ९) या दोघी अतिगंभीर जखमी झाल्या होत्या; मात्र या दोघी अतिशय गरीब आणि अशिक्षित कुटुंबातील असल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी पुणे येथे नेता आले नाही. पूजा व गीताचा सांभाळ करणाऱ्या आजीची तशी परिस्थितीही नव्हती. त्यामुळे सातारा, तरडगाव नंतर या दोघींना भुर्इंज येथे पत्र्याच्या झोपडीत आणून ठेवले. या ठिकाणी जणू या दोघींच्या मृत्यूची वाट पाहिली जात होती. पैशाअभावी रुग्णालयात उपचार करता येत नसल्याने झोपडीत तडफडणाऱ्या पूजा व गीताची कैफियत ‘लोकमत’ने मांडताच माणुसकीचा जणू सागरच उसळला.प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ‘लोकमत’मधील वृत्त पाहताच थेट भुर्इंज गाठले. पूजा व गीताला पाहून खेबूडकर हेलावून गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचारासाठी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान भारताचे थायलंडमधील राजदूत राजेश स्वामी, वाई राष्ट्रवादी युवकाचे अध्यक्ष मामा देशमुख, वाई तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष अतुल जाधव-इनामदार, किशोर रोकडे, मधुकर शिंदे, जयवंत पवार, शामराव भोसले, अजय माळवदे, विनीत खरे, प्रशांत भोसले-पाटील यांच्यासह तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पूजा व गीताच्या उपचारासाठी मदतीची विचारणा झाली. सातारचे संजीवन हॉस्पिटलचे मनोज वाघ यांनीही या दोघींवर हॉस्पिटलचे व्यवस्थापन उपचारासाठी तयार असल्याचे कळवले. मात्र, ओझर्डे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने पुढाकार घेत दोघींच्या उपचाराची व्यवस्था केली. (वार्ताहर) अनेकांची जबाबदारी घेण्याची तयारीपूजा व गीतावर उपचार व्हावेत, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले व त्यांचे सहकारी या दोघींच्या घरी जाऊन आले. उपचारासाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याचेही तयारी त्यांनी दर्शवली होती. मजूर फेडरेशनचे सतीश भोसले यांनी मुंबई येथील रुग्णालय व धर्मादाय संस्थाशी संपर्क साधण्याची तयारी दर्शवली होती.