शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रचार कार्यालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:59 IST

दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली.

ठळक मुद्देप्रचार कार्यालये हाऊसफुल्ल मतदार कुटुंबाला गाठण्यासाठी अधिक धडपड

कोल्हापूर : दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली.मतदारनिहाय यादी करून वैयक्तिक गाठीभेटी घेणे, प्रत्येक वॉर्डनिहाय कोपरा प्रचारसभांचे नियोजन करणे, केंद्रनिहाय याद्या करणे, अशा विविध कामांची लगबग कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार व शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील प्रचार कार्यालयात गुरुवारी दिसून आली. या कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी आमदारांचे सुपुत्र ऋतुराज जातीनिशी येथे बसून असल्याचे चित्र होते.दिवसभरातील सभांचे नियोजन, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, प्रचार साहित्याचे वाटप, नागाव, चुये, पाचगाव, उचगाव, आदी परिसरांत कोपरा सभांचे नियोजन, अशा एक ना अनेक कामांचे वाटप सुरू असल्याचे चित्र दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या जिल्हा कार्यालयात दिसले. या कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये लगबग दिसून आली.संगणकावर मतदारनिहाय यादी करणे, मतदारांची यादी करून त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे, प्रचारसाहित्य तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे; गावनिहाय याद्या करून योग्य त्या समन्वयक कार्यकर्त्यांकडे पोहोचल्या की नाहीत याची फोनद्वारे शहानिशा करणे; यासह कार्यकर्ते योग्य त्या मतदारांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी जोडणी लावणे, आदी लगबग दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या रुईकर कॉलनी येथील कार्यालयात सुरू असल्याचे चित्र होते.पेठापेठांत फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंना गाठणे, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, याची शहनिशा करणे, विविध पेठांतील कोणत्या मतदाराला गाठल्यानंतर आपल्याला मतदान होईल, आदींबाबत खलबते सुरू असल्याचे चित्र उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या शिवाजी स्टेडियम परिसरातील कार्यालयात गुरुवारी दिसून आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यालयच जाधव यांचे प्रमुख प्रचार कार्यालय झाल्याचे चित्र येथे होते.शहरातील बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वैयक्तिक गाठीभेटी घेण्याचे नियोजन, प्रचारसाहित्य वाटप, अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे जाता येईल, अशा एक ना अनेक चर्चेची खलबते सुरू असल्याचे चित्र उत्तर विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार सतीशचंद्र कांबळे यांच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कार्यालयात गुरुवारी होते. 

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर