शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवा  : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:36 IST

CoronaVirus Kolhapur : सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाची लाट लहान मुलांपर्यंतदेखील पोहोचत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठीही व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार ठेवा अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या. रुग्णाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत. नागरिकांनीही लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देलहान मुलांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवा : हसन मुश्रीफ रिपोर्टची वाट न बघता उपचार करण्याची सूचना

कोल्हापूर : सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाची लाट लहान मुलांपर्यंतदेखील पोहोचत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठीही व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार ठेवा अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या. रुग्णाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत. नागरिकांनीही लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले.कोरोना उपाययोजना आणि लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.जिल्ह्यातील मृत्यूदर कसा रोखता येईल, याबाबत ते म्हणाले, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते-ते करा. सध्याच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा, औषधे, रेमडेसिविर आणि ॲंटिजन किट याची व्यवस्था केली जाईल.यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, नोडल अधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनाही टास्कफोर्स पाठविण्याची सूचना करून जिल्ह्याला १० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले. ग्रामीण स्तरावर आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी संगणकीय सादरीकरण केले. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आयुक्त डॉ. बलकवडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही सद्यपरिस्थितीचा आढावा दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर