नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील जगदाळे शेत ते यादव पूल कुरुंदवाड रस्ता उत्तर-पश्चिम बाजूस असणाऱ्या लोकवस्तीत व शेतीत पावसाचे पुराचे पाणी साचून राहते. तसेच या भागात गटार व्यवस्था नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. तरी या भागात मोठी आरसीसी गटर बांधण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले.
जगदाळे शेत ते यादव पूल उत्तर पश्चिम बाजूस लोकवस्ती आहे. मात्र येथील घरांना सांडपाणी निचरा होण्यासाठी गटार नसल्याने या भागातील लोकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या या राज्य मार्गावर रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामातून या परिसरात मोठी आरसीसी गटर केल्यास येथील सांडपाणी निचरा होण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे. तरी याबाबत मंत्री यड्रावकर यांनी लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्री यड्रावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ बोलून योग्य तो निर्णय घेऊन आरसीसी गटाराचे काम मार्गी लावले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी दत्तात्रेय मोरबाळे, सुकुमार वागळे, रमेश सुतार, रवींद्र केसरकर, प्रवीण अनुजे आदी उपस्थित होते.
फोटो - १२०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.