कोल्हापूर : कोरोना आजारामुळे बाधित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांना तसेच मृत वकिलांच्या वारसांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडून आर्थिक मदतीचा हातभार देण्यात आला. बाधित झालेल्या वकिलांना ५० हजार रुपये व कोरोनामुळे मृत पावलेल्या वकिलांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात येत आहेत.
मदतीचे हे धनादेश बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते व माजी अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. ही मदत मिळवून देण्यासाठी बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य ॲड. विवेक घाटगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
गतवर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक वकिलांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे भाग पडले होते. या उपचाराचा खर्च बार कौन्सिलकडून धनादेशाद्वारे संबंधित वकिलांना परत देण्यात आला. कोरोना कालावधीत सुमारे नऊ महिने कामकाज बंद असल्यामुळे बार कौन्सिलकडून मिळालेल्या मदतीच्या धनादेशामुळे वकिलांना योग्यवेळी मदत मिळाल्याचे समाधान वाटले.
फोटो नं. २८०१२०२१-कोल-कोल्हापूर कोर्ट
ओळ : कोरोना कालावधीत बाधित वकिलांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडून धनादेश स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली. गुरुवारी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते ॲड. संग्राम पाटील यांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश मोरे, बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे आदी उपस्थित होते.