दीपक माळी यांना पीएचडी
कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्रा. दीपक माळी यांना शिवाजी विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ‘व्हॅलिडेटिंग अँड ऑप्टिमाईझिंग लिड्स आयडेंटिफाईड फ्रॉम प्लॉट सोर्सेस टार्गेटिंग कार्डीओव्हॅस्क्यूलर ॲक्टिव्हिटी’या विषयावर संशोधन केले. त्यांनी केलेले संशोधन हे उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्याचे काम करते. त्यांना या संशोधनासाठी डॉ. एन. एम. भाटिया, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्या डॉ. एम. एस. भाटिया यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२९०६२०२१-कोल-दीपक माळी (पीएचडी)
महेश यादव यांची निवड
कोल्हापूर : येथील महेश बाळासाहेब यादव यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या नियुक्तीसाठी यादव यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप कुंभार यांचे सहकार्य लाभले.
फोटो (२९०६२०२१-कोल-महेश यादव (बीजेपी)