शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation-सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 18:39 IST

Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून आत्मक्लेश, निर्दशने, ठिय्या आंदोलन करून बुधवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाबाबत योग्य भूमिका सरकारने घ्यावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा या संघटनांनी यावेळी दिला आहे.

ठळक मुद्देसकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध आत्मक्लेश, ठिय्या, निर्दशने : तीव्र लढा देण्याचा इशारा

कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून आत्मक्लेश, निर्दशने, ठिय्या आंदोलन करून बुधवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाबाबत योग्य भूमिका सरकारने घ्यावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा या संघटनांनी यावेळी दिला आहे.दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने सकाळी निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाने ४५ वर्षे केलेला संघर्ष राज्य सरकारने धुळीला मिळविला आहे. त्यामुळे आता सियासत अगर जंग चाहती हे तो जंग ही सही या भूमिकेत मराठा समाज राहणार आहे. त्याची सुरूवात कोल्हापूरमधून होईल, असे समन्वयक सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी सांगितले.यावेळी स्वप्नील पार्टे रुपेश पाटील, भास्कर पाटील, रवी जाधव, सामर्जीत तोडकर, शैलेश जाधव, उमेश साळोखे उपस्थित होते. शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बुधवारी शांततेने ठिय्या आंदोलन करून आरक्षण रद्दबाबत निषेध नोंदविला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शौर्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी दिला. यावेळी प्रकाश सरनाईक, महादेव आयरेकर, मनोहर सोरप, विक्रम पवार, राजेंद्र थोरावडे, नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर