व्हॅलेंटाईन डे याला महाविद्यालयीन विभागाकडून रोखले जाणे आवश्यक आहे. या उपक्रमात एकतर्फी प्रेमाचे तसेच जबरदस्तीचे प्रकार आढळून येतात. अनेक मुली, महिला आकर्षणापोटी जाळ्यात सापडून शिकार होत आहेत. इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून सर्व राज्यातील लोक उद्योग, नोकरीनिमित्त कायमस्वरूपी येऊन राहिले आहेत. स्थानिकांसह अन्य भागातून आलेल्या कुटुंबाना व्हॅलेंटाईनच्या झळा बसल्या आहेत. तसेच याला खतपाणी घालणाऱ्या नव्याने उदयाला आलेल्या कॉफी शॉपना त्वरित आळा घालावा, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि प्रांताधिकाऱ्यांना दिले. शिष्टमंडळात किशोर मोदी, शिवप्रसाद व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, प्रवीण सामंत, संतोष हत्तीकर, बाळासाहेब ओझा, मुकेश दायमा, जितेंद्र मस्कर, आदींचा समावेश होता.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली गैरप्रकाराला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST