गावच्या मध्यवर्ती ठिकाणी परशुराम तलाव आहे. याच तलावातून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ७ वर्षांपूर्वी तलावाच्या काठाचे सुशोभीकरण करतानाच तलावकाठही सुरक्षित होण्यासाठी ग्रामपंचायतीने संरक्षक भिंतीचेही काम केले होते.
मात्र, यंदाच्या माॅन्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसात संरक्षक भिंत ढासळल्याने तलावकाठ असुरक्षित बनला आहे. या भिंतीच्या पडझडीने सलग्न भिंतीलाही धोका तयार झाला आहे. रात्रीच्यावेळी भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही.
दरम्यान, यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता सरपंच ज्योत्स्ना पत्ताडे व उपसरपंच निवृत्ती मांडेकर यांनी संरक्षण भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेणार आहोत. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करणार आहे. यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्याकडे निधीसाठीही प्रयत्न करणार आहोत.
-------------------------
फोटो ओळी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील परशुराम तलावाच्या मुख्य घाटालगतची संरक्षक भिंत जोरदार पावसामुळे कोसळली.
क्रमांक : १७०६२०२१-गड-०६