शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:56 IST

राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देपतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्रीकोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक

कोल्हापूर : राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण तुषार काकडे, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन शंकर पाटील, वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील, आदी उपस्थित होते.मंत्री देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या विशेषत: पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी सहकारात शिस्त आणि पारदर्शकता जोपासून सभासदहितास प्राधान्य देणे गरजेचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार पतसंस्थांची संख्या वाढविणे आवश्यक असून, अडचणीतील पतसंस्थांना ‘एमसीडीसी’च्या माध्यमातून साहाय्य करून त्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी शासन पुढाकार घेईल.शंकर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘एमसीडीसी’ला भाग भांडवलाप्रती एक कोटी उपलब्ध करून दिले जाईल. संतोष पाटील यांनी स्वागत केले

कर्ज वितरणासाठी तीन सदस्यांची समितीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाºया कर्जाचे व्याज शासन भरणार आहे. राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांनी या कर्जयोजनांमध्ये सक्रिय होऊन अधिकाधिक तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. कर्ज वितरणासाठी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांसह तीन सदस्यांची समिती स्थापन करून ही कर्जप्रकरणे मंजूर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे मंत्री देशमुख म्हणाले.

 कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांच्या विशेष बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संतोष पाटील, मिलिंद आकरे, धनंजय डोईफोडे, तुषार काकडे, अरुण काकडे, नीलकंठ करे, शंकर पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखkolhapurकोल्हापूर