शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

टोलबाबतचा प्रस्ताव अमान्य

By admin | Updated: August 28, 2014 00:10 IST

कृती समितीची बैठक : मंत्र्यांचा निषेध; उपरा कोण हे मंत्र्यांनी जाहीर करावे

कोल्हापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोलमधून एम एच ०९ वाहने वगळण्याचा ठेवलेला प्रस्ताव सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीने आज, बुधवारी बैठक घेऊन अमान्य केला. ‘टोल पंचगंगेत बुडवू’, असे लेखी देणाऱ्या या दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक केल्याने त्यांचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे होते.दोन्ही मंत्र्यांनी १६ जानेवारी २०१४ रोजी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले उपोषण सोडविण्यासाठी टोल रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्र्यांना अपुरी माहितीही दिली. आता फक्त एम एच ०९ नंबरच्या वाहनांना टोलमधून वगळण्याचा घाट घातला जात आहे. कृती समिती हा पर्याय कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही, असे कृती समितीतर्फे निवास साळोखे यांनी जाहीर केले.गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजन समारंभात उपऱ्यांनी आम्हास शिकवू नये, असे वक्तव्य केले होते. याबाबतही मंत्र्यांनी नावासह खुलासा करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. बैठकीला रामभाऊ चव्हाण, संभाजी जगदाळे, भगवान काटे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, हिंदुराव शेळके, आदीं कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)