शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 01:09 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण ...

कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी २७ हजार कोटींची आवश्यकता आहे. याचे सादरीकरण जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी राधानगरी धरण येथे मंगळवारी केले. दरम्यान, जिल्ह्यात चार पथकांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.यानंतर जागतिक बॅँकेचे राज सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांनी राधानगरी धरण येथे भेट दिली. या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे सादरीकरण करून माहिती दिली. पुराचे सुमारे ११५ टीएमसी पाणी वाहून जाते, हे पाणी कुंभी, कासारी, वारणा, कोयना, कृष्णा, नीरा, भीमा या नद्यांमार्गे उजनी धरण येथे नेण्याचा हा प्रकल्प आहे; त्यासाठी २०१ कि. मी. अंतर लागणार आहे. दुष्काळ असलेल्या सांगलीतील पाच तालुके, साताऱ्यातील चार, सोलापुरातील ११, पुणे दोन, मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील एका तालुक्याला याचा लाभ होईल. यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावर या प्रकल्पाची संकल्पना चांगली असल्याचे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींनी सांगितले. राधानगरी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने १00 टक्के धरण भरल्यावरच ते उघडतात, असे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर प्रतिनिधींनी ५० टक्के धरण भरल्यानंतर हे दरवाजे उघडता येतील, या पद्धतीने रचना असायला हवी, असे सांगितले; परंतु हे धरण हेरिटेज असल्याने ते शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले. त्याचबरोबर प्रतिनिधींनी २५ वर्षांत येणारा पूर डोळ्यासमोर ठेवून ५० वर्षांची ब्लू लाईन आखून नद्यांच्या परिसरातील कुटुंबांचे स्थलांतर करावे, असे मत मांडले; परंतु हे शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जागतिक बॅँकेच्या व एशियन बॅँकेच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, आदी उपस्थित होते.शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणारपूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करून बॅँकेचे प्रतिनिधी उद्या, गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पुराच्या पाण्याचा वापर कसा करता येईल, पुरामुळे रस्ते पाण्याखाली जाऊ नये, तसेच घरांचे नुकसान होणार नाही, या पद्धतीने घरांची निर्मिती, पूरग्रस्त भागात उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे, यासंदर्भातील माहिती बॅँकेच्या प्रतिनिधींना दिली आहे, असे प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.उड्डाणपुलाचा विषय ‘लोकमत’ने मांडलापूरग्रस्त भागात उड्डाणपूल होणार अशा आशयाचे वृत्त ४ सप्टेंबरला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या उड्डाणपुलासंदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत चर्चा झाली.बँकेचे शिष्टमंडळ असेपुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणाºया जागतिक बॅँकेच्या शिष्टमंडळात अनुप करनाथ, पीयूष शेखसरिया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकीओ टनाका, आय जसब्रँड एच. डी. जोंग, विजयशेखर कलवाकोंडा, इड्युरडो फेरियरा यांचा समावेश होता.