शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शिरोळमध्ये पूरबाधित गावांत नौकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:05 IST

महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते.

ठळक मुद्दे लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव तालुक्यात ३६ पैकी २३ नौका नादुरुस्त

संदीप बावचे।शिरोळ : एनडीआरफ, लष्कर, नौदलाच्या पुढे जाऊन लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कामगिरी शिरोळ तालुक्यातील अनेक नावाड्यांनी बजावली. प्रामुख्याने आलास, कनवाड, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर या ठिकाणी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना पैलतीरी पोहोचवून नावाड्यांनी जिगरबाज कामगिरी बजावली.

महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा आली. त्यामुळे आपत्ती काळात लाकडी नावांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.

शंभर वर्षांतील सर्व रेकॉर्ड मोडून प्रलयकारी महापुराने शिरोळ तालुक्यात थैमान घातले. सन २००५ च्या महापुराची गणिते मांडणाऱ्या अनेक पूरग्रस्तांची गणिते चुकली. सुरुवातीला अनेक पूरग्रस्तांनी पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला. मात्र, ५ आॅगस्टनंतर पुराचे पाणी झपाट्याने वाढू लागल्यानंतर अनेक गावांचे मार्ग बंद झाले. त्यामुळे नावेतून स्थलांतर होण्याशिवाय पर्याय नव्हता. वाढणाºया पाण्याची धास्ती घेतलेले अनेकजण जिवाच्या आकांताने चिंताग्रस्त होते.

अशा संकटात पूरग्रस्तांसाठी स्थानिक नावाडी धावून आले. आलाससह कनवाड, गणेशवाडी, खिद्रापूर, कवठेसार, कोथळी, औरवाड येथील नावाड्यांनी अनेक पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. त्यानंतर लष्कर, नौदल, एनडीआरएफची पथके दाखल झाली. त्यांच्याबरोबरीनेच स्थानिक नावाड्यांनीदेखील जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविले.महापुराच्या या आपत्तीनंतर ‘गाव तिथं नाव’ हा प्रस्ताव पुढे आला आहे. सन २००५ च्या महापुरात सुमारे ४० गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता, तर यंदाच्या महापुरात सुमारे ४७ गावे पूरबाधित झाली.

२००५ सालातील महापुरानंतर गाव तिथं नाव असा ठराव पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला होता. त्यानंतर ४२ गावांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाकडी नौका आल्या होत्या. त्यानंतर कालांतराने ३६ गावांत लाकडी नौका राहिल्या. मात्र, महापुराच्या आपत्तीत तेरा गावांतीलच नौका सुस्थितीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कनवाड, आलास, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर, राजापूर, नांदणी, धरणगुत्ती, कोथळी, उदगाव, औरवाड, नृसिंहवाडी, आदी गावांतील नौका चांगल्या स्थितीत असल्यामुळे त्याचा वापर झाला.

गाव तिथं नाव या माध्यमातून सुस्थितीत नौका सुरू ठेवण्याबरोबरच आपत्ती काळात अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसवून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा प्रस्ताव पुढे आला आहे. क्षमतेपेक्षा जादा लोकांची वाहतूक लाकडी नौकांतून पूरकाळात करण्यात आली. मात्र, मर्यादित संख्याच नावेत असावी, हा मुद्दा पुढे आला आहे. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास महापुराच्या काळात त्याचा निश्चित फायदा होणार आहे.शासकीय यंत्रणेबरोबरच कामगिरीअनेक जिगरबाज नावाड्यांनी महापूर काळात विनामोबदला सेवा बजावली. जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविणाºया नावाड्यांना मदतीचे हात आता पुढे आले आहेत. शासकीय यंत्रणेबरोबर त्यांनीही महापूर काळात चांगली सेवा बजावली. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास शासनाच्या यंत्रणेची गरजच भासणार नाही. त्यामुळे शासन पातळीवर याबाबत कार्यवाही होणे तितकेच गरजेचे आहे. 

लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास निश्चितच फायदा होणार आहे. अशा नौका चालविणाºया नावाड्यांना शासनाने कायमस्वरूपी मानधन द्यावे. शिवाय लाईफ जॅकेट याबरोबरच आपत्तीकाळातील सुविधा पुरवाव्यात.- सदाशिव आंबी, नावाडी गणेशवाडीमहापूर काळात लाकडी नौका चालविणाऱ्यांनी पूरग्रस्तांना स्थलांतरित करून चांगले काम केले आहे. या लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास आणखीन जलद काम त्यांना करता येईल. त्यासाठी शासनाकडे अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव देणार आहोत. - समीर शिंगटे, प्रांताधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर