शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

अपात्र संचालकांवरील कारवाई लांबणीवर

By admin | Updated: March 9, 2016 00:52 IST

१५ मार्चला सुनावणी : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्हा बॅँक संचालकांचा समावेश

कोल्हापूर : नवीन वटहुकुमानुसार अपात्र ठरलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालकांवरील कारवाई लांबणीवर पडली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्यासमोर आता १५ मार्चला सुनावणी होणार असून, या दिवशीच अपात्रतेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने बरखास्त संचालक मंडळाला पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने वटहुकूम लागू केला आहे. या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा बॅँकेचे अकरा, सांगली जिल्हा बॅँकेचे सात, तर सातारा जिल्हा बॅँकेचे एक असे १९ संचालक अपात्र ठरले आहेत. याबाबत विभागीय सहनिबंधक दराडे यांनी संबंधितांना अपात्रतेची नोटीस लागू केली आहे. तोपर्यंत अपात्र संचालकांनी शासनाच्या वटहुकुमाविरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबतची सुनावणी आता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुरू आहे. सोमवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत सरकारने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने मंगळवारच्या सहनिबंधकांकडील सुनावणीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तिन्ही बॅँकांच्या १९ अपात्र संचालकांच्या वतीने अ‍ॅड. लुईस शहा यांनी मंगळवारी सहनिबंधकांसमोर बाजू मांडली. २१ मार्चला उच्च न्यायालयात वटहुकुमाबाबत सुनावणी असल्याने त्यानंतरच आपण सुनावणी घ्यावी, अशी विनंती अ‍ॅड. शहा यांनी केली; पण सहनिबंधक दराडे यांनी त्यास नकार देत १५ मार्चला याबाबत सुनावणी होणार असल्याचे सांगितले. अ‍ॅड. शहा यांच्यासमवेत बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, आर. के. पोवार, रणजित पाटील, आसिफ फरास उपस्थित होते. सहनिबंधकांनी नैसर्गिक न्यायपद्धतीने अपात्र संचालकांना म्हणणे मांडण्याची तीन वेळा संधी दिली आहे. त्यात रिझर्व्ह बॅँकेच्या कारवाईत बरखास्त संचालक आहेत का? ते पुन्हा संचालक मंडळात आहेत का? एवढेच तपासले गेल्याने यापेक्षा वेगळे म्हणणे सादर करण्याची गरजही भासणार नाही. त्यामुळे १५ मार्चला सहनिबंधक दराडे संबंधितांना अपात्र केल्याचे आदेश काढतील, अशी दाट शक्यता आहे. सांगली जिल्हा बॅँक : आमदार अनिल बाबर, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, विलासराव पाटील, सिकंदर जमादार.सातारा जिल्हा बॅँक : माजी खासदार लक्ष्मणतात्या पाटील.यांच्यावर आहे कारवाईची टांगती तलवारकोल्हापूर जिल्हा बॅँक : आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, अशोक चराटी, निवेदिता माने, पी. जी. शिंदे, नरसिंग पाटील, राजू आवळे.