शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालफितीत प्रकल्प अडकणार नाहीत

By admin | Updated: June 23, 2014 00:49 IST

प्रकाश जावडेकर : कस्तुरीरंग अहवालाची पुन्हा पडताळणी

कोल्हापूर : वन किंवा पर्यावरण खात्याच्या किचकट परवानगीवाचून येथून पुढे एकही सार्वजनिक हिताचा प्रकल्प रखडणार नाही. ‘विकास आणि पर्यावरण साथ-साथ’ हे घोषवाक्य घेऊनच येथून पुढे ही दोन्ही खाती काम करतील, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, माहिती-दळणवळण व वनराज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जावडेकर म्हणाले, संरक्षण विभागाच्या महत्त्वाच्या परवानग्या तीन वर्षे रखडल्या होत्या. याबाबत तीस मिनिटे चर्चा करून तीन मिनिटांत मंजुरी दिली. रस्त्यांसह इतर प्रकल्प वन किंवा पर्यावरण विभागाच्या किचकट लालफितीच्या कारभारात अडकणार नाहीत. देशातील २४ टक्के वनक्षेत्र येत्या दहा वर्षांत ३४ टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. शुद्ध हवा, पाणी व घनकचरा व्यवस्थापन ही उद्दिष्टे ठेवूनच काम करणार आहे. प्रत्येक गावात एफ. एम. ऐकू येईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. कम्युनिटी रेडिओ सुरूकरण्यात येतील. दूरदर्शन लोकप्रिय होण्यासाठी नव्याने कृती कार्यक्रमांची आखणी केली आहे. पुढील आठवड्यात ‘मिनिस्टर कॉर्नर’ या खात्यांच्या वेबसाईटवर सुरू होईल, तक्रारी किंवा सूचनांसंबंधात नागरिक थेट संपर्क साधू शकतील. सह्याद्री बचावासाठी कस्तुरीरंगन अहवालाची पडताळणी केली जाईल. सातही राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उपग्रह अहवालापेक्षा जमिनीवरील वस्तुनिष्ठ अहवाल देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जनसहभागातून पर्यावरण संवर्धन करण्यावर भर राहील, अशी ग्वाही जावडेकर यांनी दिली. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश हाळवणकर, महेश जाधव आदी उपस्थित होते.