शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सभापती राजीनामा लांबणीवर -सोमवारनंतरच प्रक्रिया:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:13 IST

बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे

ठळक मुद्देनेत्यांच्या कानावर घालण्याचा निर्णय

कोल्हापूर : बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे. दोन दिवसांत यावर चर्चा होऊन सोमवार (दि. २६)नंतर राजीनामा देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समिती सत्तास्थापनेच्या ठरलेल्या सूत्रानुसार राष्ट्रवादीचे कृष्णात पाटील यांची सभापतिपदाची, तर शेकापचे अमित कांबळे यांची उपसभापतिपदाची मुदत संपली आहे. बुधवारी (दि. २१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘या दोघांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामे द्यावेत,’ असा निर्णय झाला होता. स्वत: आमदार हसन मुश्रीफ यांनीही संचालक मंडळाच्या बैठकीनंतर राजीनामे द्यावेत, असे आदेश दिले होेते.पण ठरल्याप्रमाणे गुरुवारी राजीनामे होऊ शकले नाहीत. १० ते १२ संचालकांची दुपारी बाजार समितीत बैठक झाली. यात दोघांनी राजीनामे द्यावेत असे सांगितले; पण सभापती कृष्णात पाटील यांनी आधी राजीनामा द्यावा, असे उपसभापती अमित कांबळे यांचे म्हणणे आहे, तर उपसभापतींनी आधी राजीनामा द्यावा, असे सभापतींचे म्हणणे आहे. यावरून दोघांमध्ये दिवसभर मतैक्य होऊ शकले नाही.

संचालकांनी उपसभापतींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण सभापतींचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे गेल्यानंतर नवीन सभापती निवडीपर्यंत उपसभापतींकडे प्रभारी कार्यभार असतो. असा पायंडा यापूर्वीच्या उपसभापतींनी पाडून ठेवल्यामुुळे याची पुनरावृत्ती होईल, या शक्यतेने राजीनामे देण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा कुणी राजीनामा द्यायचा यावरून सुरू असलेला हा वाद आता नेत्यांच्या कोर्टात गेला आहे. संचालकांनी नेत्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्याचे ठरविले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण